शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी केंद्रावर शेतकºयांचे हाल

By admin | Updated: March 8, 2017 00:25 IST

जामनेर : नाफेडने ग्रेडर दिल्यास खरेदी करू, शेतकरी संघाची भूमिका, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

जामनेर  :येथील  बाजार समितीत सुरू असलेले शासकीय तूर खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकºयांचे हाल होत आहेत. केंद्रावर सुमारे १५० ट्रॅक्टरसह शेतकरी ठाण मांडून आहेत. खरेदी का बंद केली, ती केव्हा सुरू होईल याची कोणतीही माहिती शेतकºयांना शेतकरी संघ अथवा बाजार समितीकडून मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.नाफेड मार्फत खरेदी सुरू असल्याने त्यांचा ग्रेडर हजर असेल तरच खरेदी करू अशी भूमिका शेतकरी संघाने घेतली आहे. सोमवारी खरेदीची सुरुवात झाली. मात्र एकच ट्रॅक्टर मोजले गेले व नंतर खरेदी बंद करण्यात आल्याचे उपस्थित शेतकºयांचे म्हणणे आहे. बाजार समितीत असलेले हे एकमेव केंद्र असल्याने तालुक्यातील सर्वच गावातील शेतकरी तूर विक्रीसाठी येथे आणत आहे. नाफेडचे ग्रेडर जर खरेदीचे वेळी केंद्रावर येत नसतील तर शासनाने केंद्र बंद तरी करावे, जेणेकरून शेतकरी उपाशीपोटी या ठिकाणी थांबणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शासकीय तूर खरेदी केंद्रावर ग्रेडर नसल्याने खरेदी बंद केली. सुरू होईल की नाही याची शाश्वती नाही. अधिकृत माहिती मिळत नाही. शेतकºयांचे हाल होत आहे. संतप्त शेतकरी कोणत्याही क्षणी रास्तारोको अथवा आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे शेतकºयांनी ‘लोकमत’ला सांगितले.तर आंदोलन करूगुरुवारपासून खरेदी केंद्रावर तूर आणून ठेवली आहे. उघड्यावर तुरीचे पोते ठेवल्याने डुकरांचा त्रास होत आहे. घर सोडून पाच दिवस झाले कुणीच विचारपूर करायला तयार नाही. असेच सुरू राहिले तर आंदोलन करावे लागेल असा इशारा जोगलखेडे येथील शेतकरी  भास्कर पुंडलिक पाटील यांनी सांगितले.शेतकºयांचा वाली नाहीदोन दिवसापासून खरेदी केंद्रावर मोजणीची वाट पाहत आहे. आमचे हाल सुरू आहेत, कुणीही शेतकºयांचा वाली नाही. असे लोहारा येथील अपंग शेतकरी अहमदखान भिकनखान यांनी सांगितले.                       (वार्ताहर)बाजार समिती आवारात सुमारे १५० ट्रॅक्टर तूर भरलेले उभे आहेत. तर काही तुरीचे पोते उघड्यावर पडून आहेत. खरेदीला सुरुवात होईल या अपेक्षेने शेतकरी थांबून आहेत. ४भाड्याने घेतलेले ट्रॅक्टरचे दर दिवसाचे भाडे भरावे लागत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. काही शेतकºयांच्या या समस्येकडे लक्ष द्यायला कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेळ नाही.नाफेडचा ग्रेडर खरेदी केंद्रावर आल्यावरच त्याच्या उपस्थितीत तूर खरेदी करू असा निर्णय घेतला आहे. कारण हलक्या प्रतिची तूर खरेदी केल्यास ती नाफेडने स्वीकारली नाही तर जबाबदारी कुणाची? त्यामुळे ग्रेडरने उपस्थित राहावे यासाठी संपर्क करीत आहोत.               - चंद्रकांत बाविस्कर, चेअरमन, शेतकी संघ, जामनेरतीन दिवसांपासून केंद्रावर तूर आणून ठेवली आहे.  खरेदी बंद पडल्याने ट्रॅक्टरचे दर दिवसाचे भाडे भरावे लागत आहे. हमीभावाने तूर खरेदी करण्याचा शासनाचा निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे वाईट वाटते.                    -रघुनाथ वाघ,शेतकरी, शहापूर