शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रेमडेसिविरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तारेवरची कसरत सुरू असताना रेमडेसिविरची निर्यात सुरूच राहिल्याने त्याचा तुटवडा भासत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तारेवरची कसरत सुरू असताना रेमडेसिविरची निर्यात सुरूच राहिल्याने त्याचा तुटवडा भासत आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच निर्यातबंदी केली असती तर रेमडेसिविरचा तुटवडा भासला नसता. मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज रुग्णांच्या नातेवाइकांची फिरफिर होत आहे, अशी टीका माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकारवर केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये रविवारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या ठिकाणी खडसे यांनी भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

राजकारण बाजूला ठेवा

कोरोनाच्या काळात राज्य सरकार आपल्या अखत्यारीत जे आहे, त्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. परंतु, रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने मर्यादा येत असून ज्या ठिकाणी कोरोनाची रुग्णसंख्या जास्त आहे, किमान अशा ठिकाणी तरी केंद्र सरकारने राजकारण बाजूला ठेवून मदत करायला हवी, असे एकनाथ खडसे यांनी सांगत केंद्र सरकारवर टीका केली. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्या ठिकाणी ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन तसेच इतर औषधांचा पुरवठा करायला हवा, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

फडणवीस यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना खडसे म्हणाले, फडणवीस सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडेल असे सांगत आहे; परंतु आपले कार्यकर्ते टिकून राहावेत म्हणून फडणवीस हा आटापिटा करत आहेत. मला वाटलं फडणवीस उत्तम भविष्यकार असतील. त्यांनी आतापर्यंत चार ते पाच वेळा सरकार पडणार म्हणून सांगितले. आता त्यांनी पुन्हा २ तारीख दिली आहे. मी २ तारखेची वाट पाहतो आहे. जर २ तारखेला सरकार पडले नाही, तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे असे मी समजेल, असेही खडसेंनी सांगितले.

कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळलो नाही

महाराष्ट्र राज्याची एक परंपरा राहिली आहे. ज्या ज्या वेळी राज्य संकटात आले किंवा आकस्मिक संकटाचा प्रसंग उद्भवला; मग तो किल्लारीचा भूकंप असो किंवा मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत, अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केले आहे. मी स्वतः विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्षनेता म्हणूनही मी काम केले आहे. पण, आम्ही संकटाच्या काळात असा कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळला नाही, अशी टीकादेखील खडसे यांनी विरोधी पक्षावर केली. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, मला वाटते विरोधी पक्षनेत्याकडून हे अपेक्षित नव्हते, असेही त्यांनी नमूद केले.