शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

न्हावी येथे वीज मीटरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 15:24 IST

दोषयुक्त २२ मीटरची मागणी करूनही मिळत नसल्याचे चित्र आहे.

न्हावी, ता.यावल : शेतात पिकांना विहीर, कूपनलिकेद्वारे पाणी देण्यासाठी विजेची आवश्यकता असतानाही वीज मीटर मागूनही मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, परिसरातील अर्धा डझन गावातील दोषयुक्त असलेले २२ मीटर बदलून मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करूनही त्यांच्या विनवणीकडे वीज कंपनीने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गावात वीज मीटर लवकर मिळत नसून , संबंधितांनी लक्ष घालावे, अशी मागणी आहे.परिसरात न्हावी गाव तसे संपूर्ण शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. वीज वितरण कंपनीच्या न्हावी कार्यक्षेत्राच्या अंतर्गत न्हावी गावासह मारुळ, बोरखेडा, तीळ्या, अंधार मळी व मोहमांडली अशी सहा गाव येतात.न्हावी कार्यालयाच्या अंतर्गत एक साहाय्यक अभियंता,  एक लाईनमन, सात वरिष्ठ तंत्रज्ञलागतात. त्यातील सात वरिष्ठ तंत्रज्ञापैकी सहा तंत्रज्ञ असून, वरिष्ठ तंत्रज्ञाचे एक पद रिक्त आहे. तीन कनिष्ठ तंत्रज्ञ आहेत. यापैकी एक भरलेले असून, दोन पदे रिक्त आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ व कनिष्ठ तंत्रज्ञ अशी एकूण तीन पदे रिक्त आहेत. असे असले तरी अशा तीन  रिक्त जागी बाह्य तीन विद्युत कर्मचारी कार्यरत आहेत. न्हावी कार्यालयाच्या अंतर्गत असे एकूण १२ जण कार्यरत आहेत.गावातून नवीन वीज जोडणीची सतत मागणी असते. सध्या नवीन जोडणी ऑनलाइन असल्याने  नवीन मीटर  जोडणी ही मीटर नसल्याने पेंडिंग आहे.  आमच्याकडे मीटर नाही. आले की आम्ही लगेच क्रमाने मीटरची जोडणी करतो. मीटर आपल्याकडे  स्टोअरला मीटर शिल्लक पाहिजे असा नियम  नाही. ऑनलाइन नोंदणी असल्याने आम्ही मागणीही करीत नाही. ती पोर्टलवर किती नवीन मीटरची मागणी आहे ते दिसते.  १२ एप्रिलला १६ मीटर आले. त्यातील नवीन १३ घरगुती मीटर  दोन खेपचे व एक टेस्टिंगचे असे १६ मिटर बसवले असून,  १२ एप्रिलपासून एकही मीटर शिल्लक नाही. आम्ही दोषयुक्त २२ मीटर  नवीन मिळावे यासाठी वरिष्ठांना कळविले आहे. मीटरची वेळोवेळी मागणी करूनसुद्धा मीटर मिळत नाही.-धनंजय चौधरी, सहायक अभियंता, वीज वितरण कंपनी कार्यालय, न्हावी, ता.यावल

३१ मार्चला घरमालकाच्या नावाने  डिमांड नोट  भरली असून, वीज मीटर मिळाले नाही. लवकर मिळणे अपेक्षित आहे. त्यामध्ये तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालणे अपेक्षित आहे. -पंडित चौधरी, वीज ग्राहक, न्हावी,  ता.यावल

टॅग्स :FarmerशेतकरीYawalयावल