गाळ््यांवरील कारवाईच्या निषेधार्थ दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:31 IST2019-10-14T13:31:13+5:302019-10-14T13:31:35+5:30

जळगाव : जळगाव महापालिकेच्या करार संपलेल्या गाळ््यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जळगावातील व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवून निषेध ...

Shops closed to protest street action | गाळ््यांवरील कारवाईच्या निषेधार्थ दुकाने बंद

गाळ््यांवरील कारवाईच्या निषेधार्थ दुकाने बंद

जळगाव : जळगाव महापालिकेच्या करार संपलेल्या गाळ््यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जळगावातील व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त करीत आहे.
मनपाच्या गाळ््यांचा करार संपला असून त्या संदर्भात व्यापाऱ्यांना दंडाच्या नोटीसदेखील देण्यात आलेल्या आहेत.
सोमवारी गाळे जप्तीची कारवाई सुरू झाली असताना वाद झाला व हा प्रकार पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. त्या वेळी तेथे व्यापारी व उपायु्क्त गुट्टे यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर उपायुक्तांना कोंडण्याचा प्रयत्नदेखील झाला.
या कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद करून या कारवाईचा निषेध केला.

 

Web Title: Shops closed to protest street action

टॅग्स :Jalgaonजळगाव