शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोलीत एस.टी. आरक्षणाने वाजले फटाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

शिरसोली: शिरसोली प्र नं. येथील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण महिला एस. टी. (अनुसूचित जमाती) निघाले. परंतु निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये ...

शिरसोली: शिरसोली प्र नं. येथील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण महिला एस. टी. (अनुसूचित जमाती) निघाले. परंतु निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये एस. टी. महिला उमेदवारच नसल्याने व एकमेव एस.टी. पुरुष उमेदवार असल्याने गावात धुमधडाक्यात फटाके फुटून गुलाल उधळला गेला. परंतु तहसीलदारांनी महिलेचेच आरक्षण निघाले, असे जाहीर केल्याने सर्वत्र नाराजीचा सूर उमटत असून सरपंचपदाचे दावेदार एकमेव एस.टी. पुरुष असलेल्या उमेदवारालाच बहाल करण्यात यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

शिरसोली प्र नं. ग्रामपंचायतीत एकूण सहा प्रभाग असून सहा प्रभागांमध्ये १७ ग्रामपंचायत उमेदवार निवडून आले आहेत. मागील वर्षी येथील सरपंच पद हे जनरल असल्याने यंदा सरपंचपदाचे आरक्षण हे एस. टी. महिला निघाले आहे. परंतु निवडून आलेल्या सतरा उमेदवारांमध्ये एकही एस. टी. महिला उमेदवार नाही. असे असले तरी या सतरा उमेदवारांपैकी एक उमेदवार हा एस.टी. पुरुष असल्याने निघालेल्या आरक्षणानुसार आपणच सरपंचपदाचे एकमेव दावेदार समजून आनंदाच्या भरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाके फोडून टाकले. परंतु तहसीलदारांनी महिलेचेच आरक्षण निघेल, असे घोषित केल्याने एकमेव एस.टी. पुरुष उमेदवाराच्या आनंदावर विरजण पडल्याने प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात येत असून एस.टी. महिला उमेदवार नसताना महिलेचेच आरक्षण कसे काय काढले?. असा सवाल उपस्थितीत करून एस. टी. पुरुषाचे आरक्षण कायम करावे, अशी मागणी ग्रामस्थ, कार्यकर्ते यांच्याकडून केली जात आहे.

-------------------------

इतर उमेदवारांच्या अशा पल्लवित

निवडून अलेल्या १७ उमेदवारांमध्ये एकही एस. टी. महिला उमेदवार नसल्याने व तहसीलदारांनी महिलाच उमेदवाराचे आरक्षण निघेल, असे घोषित केल्याने नवख्या निवडून आलेल्या इतर महिला उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या असून त्या दृष्टीने त्यांनी व्यूहरचना आखायला सुरुवातदेखील केली आहे. असे असले तरी आरक्षणाचा चेडू जिल्हाधिकारी यांच्याकडे असून जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे.