अमळनेरात सावित्रीमाई फुले महिला मंडळातर्फे स्नेहमेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 14:38 IST2020-01-21T14:37:54+5:302020-01-21T14:38:46+5:30

क्षत्रिय फुलमाळी समाज संस्थेच्या मंगल कार्यालयात सावित्रीमाई फुले महिला मंडळातर्फे वार्षिक महिला स्नेहमेळावा उत्साहात झाला.

Savitrimai flowers in Amalnar with warm enthusiasm by the Women's Board | अमळनेरात सावित्रीमाई फुले महिला मंडळातर्फे स्नेहमेळावा उत्साहात

अमळनेरात सावित्रीमाई फुले महिला मंडळातर्फे स्नेहमेळावा उत्साहात

ठळक मुद्देमहिलांना सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तिका, सेनेटरी आणि गंगाळे वाटपमहिलांनी संघटित होणे गरजेचे

अमळनेर, जि.जळगाव : येथील क्षत्रिय फुलमाळी समाज संस्थेच्या मंगल कार्यालयात सावित्रीमाई फुले महिला मंडळातर्फे वार्षिक महिला स्नेहमेळावा उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी महिला बालकल्याण उपसभापती ज्योती धनंजय महाजन होत्या.
सर्वप्रथम फुले दाम्पत्य यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीपप्रज्वलन झाले. ज्योती महाजन, सानिका महाजन यांनी गीतगायनाने मान्यवरांचे स्वागत केले. उपस्थित सर्व महिलांना सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तिका व सेनेटरी आणि गंगाळे मोफत वाटप करण्यात आले.
मंडळाच्या अध्यक्षा मीना महाजन यांनी समाजातील महिलांनी संघटित होऊन समाजाच्या हितासाठी घराबाहेर पडून सामाजिक कार्यात सर्वाधिक सहभाग घेण्याचे आवाहन महिलांना केले.
प्रास्ताविक उपाध्यक्षा ज्योत्स्ना महाजन यांनी केले. सुरेखा पाटील, सुवर्णकार समाजाच्या महिला मंडळाच्या उपाध्यक्षा पूनम भामरे, पार्वताबाई चौधरी, सचिव मोहिनी खैरनार, कल्पना महाजन, ललिता माळी, अनिता पाटील, अनिता महाजन, ज्योती महाजन, हर्षदा पाटील, नीलिमा पाटील आदी उपस्थित होत्या.
यावेळी महिला सक्षमीकरणासाठी पार्वता चौधरी, पूनम भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कोमल महाजन यांनी, सहसचिव कविता महाजन यांनी आभार मानले.
 

Web Title: Savitrimai flowers in Amalnar with warm enthusiasm by the Women's Board