शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक विभागाने सोपविलेली जबाबदारी समन्वयातून पार पाडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 19:17 IST

स्वातंत्र्य दिन पूर्वतयारी आढावा बैठक : जिल्हाधिकारी यांच्या सूचना

जळगाव : भारतीय स्वातंत्र्याचा ७३ वा वर्धापन दिन शनिवारी रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त १५ आॅगस्ट सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होईल. या समारंभासाठी प्रत्येक विभागावर सोपविण्यात आलेली जबाबदारी सर्व संबंधितांनी समन्वयातून जबाबदारीपूर्वक पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंगळवारी भारतीय स्वातंत्र्याचा ७३ वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली़ त्याप्रसंगी जिल्हाधिकारीराऊत बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, पोलिस उप अधीक्षक (गृह) राजेश चंदेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील, जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे (ग्रामपंचायत), शाखा अभियंता आर. आर. चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.कुठेही कचरा दिसणार नाही़़़याची दक्षता घ्या़़़महानगरपालिकेने शहरातील सर्व भागाबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. रस्त्यावर किंवा कुठेही कचरा दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. शासकीय कार्यालयांनीही आपापले कार्यालय व परिसरात स्वच्छता ठेवावी. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ज्या शासकीय विभागांकडून जिल्हास्तरावर पुरस्कार वितरण होणार असेल, अशा विभागांनी पुरस्कारार्थींच्या नावांची यादी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपवावी. जेणेकरुन पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन करणे सुलभ होईल, अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या़स्वातंत्र्य दिनी असणार आॅनलाईन कार्यक्रमांची रेलचेलस्वातंत्र्य दिनी वृक्षारोपण, आंतर शालेय, आंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर आॅनलाइन पद्धतीद्वारे वाद-विवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा, देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन इयत्ता सातवी व आठवी आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची निवड करावी. जिल्हा पोलिस विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पुरेशी सुरक्षा व्यवस्था, राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यासाठी बॅन्डपथक तयार ठेवावे. शहरात सुरक्षा व्यवस्था ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील बगीचाचे सुशोभिकरण करुन परिसर सुस्थितीत ठेवावा. तसेच आवश्यक तेथे रंगरंगोटी करावी. त्याचबरोबर मुख्य शासकीय समारंभाच्या कालावधीत म्हणजेच सकाळी ८़३५ ते ९.३५ या वेळेत कुठेही शासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. असेही निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव