शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी परिषदेच्या बैठकीचा उमविला विसर

By admin | Updated: January 14, 2015 15:11 IST

आधीच विद्यार्थी परिषदेची निवडणूक उशिराने झाली. ती होऊन आता दोन महिने उलटल्यानंतरही विद्यार्थी परिषदेची एकही बैठक झालेली नाही.

जळगाव : आधीच विद्यार्थी परिषदेची निवडणूक उशिराने झाली. ती होऊन आता दोन महिने उलटल्यानंतरही विद्यार्थी परिषदेची एकही बैठक झालेली नाही. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला या बैठकीचा विसर पडला की काय? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धामधूममध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेण्यासाठी मुहूर्त सापडत नव्हता. या निवडणुका आटोपल्यानंतर यशावकाश विद्यापीठाने १६ नोव्हेंबरला विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेतली. मात्र, निवडणूक होऊन दोन महिने झाले तरीही विद्यार्थी परिषदेची एकही बैठक घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 
विद्यापीठस्तरावर विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी व विद्यापीठातील प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती व्हावी या उद्देशाने राज्यातील सर्व विद्यापीठात विद्यार्थी परिषदेची स्थापना केली जाते. अध्यक्ष व सचिव यांच्यासह सदस्यांची निवड निवडणुकीद्वारे केली जाते. त्यानुसार यावर्षी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदाची सौरभ देशमुख व सचिवपदाची राहुल गावीत यांनी सूत्रे स्वीकारली.
अध्यक्ष भडगाव पालिकेच्या निवडणुकीत व्यस्त
दोन महिने झाले अद्याप विद्यार्थी परिषदेची बैठक का झाली नाही? याबाबत 'लोकमत'ने अध्यक्ष देशमुख व सचिव गावीत यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता देशमुख म्हणाले की, भडगावची नगरपालिकेची निवडणूक लागल्यामुळे या निवडणूक कार्यक्रमात व्यस्त आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्या सोडवत आहोत. १६ जानेवारीला दुपारी एक वाजता विद्यार्थी परिषदेची बैठक घेण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक आजारी
सचिव गावीत याने विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक आजारी आहे. तसेच युवारंगच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे विद्यापीठातील अधिकार्‍यांशी चर्चा होऊ शकत नसल्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. 
--------
दरम्यान, नियमानुसार विद्यार्थी परिषदेची निवडणूक झाल्यानंतर सात दिवसांच्या आत विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांची तत्काळ बैठक बोलवली जाते. यात सदस्यांना नियमावली समजून सांगितली जाते. मात्र, यंदा ही बैठकदेखील झालेली नाही, असे सचिव गावीत यांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.