शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
3
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
4
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
5
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
6
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
7
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
8
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
10
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
11
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
12
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
13
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
14
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
15
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
16
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
17
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
18
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
19
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
20
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठा खंडित झाल्याने उद्योगांना करोडो रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 23:26 IST

४०० उद्योगांची चाके थांबली :  प्लॅस्टिक उद्योगांना पोहचली अधिक झळ जळगाव : शुक्रवारी संध्याकाळी औद्योगिक वसाहत परिसरामध्ये  १३२ केव्हीच्या ...

४०० उद्योगांची चाके थांबली :  प्लॅस्टिक उद्योगांना पोहचली अधिक झळ

जळगाव : शुक्रवारी संध्याकाळी औद्योगिक वसाहत परिसरामध्ये  १३२ केव्हीच्या मुख्य वाहिनीवर वीज कोसळून वी पुरवठा खंडित झाल्याने उद्योगांची चाके थांबली व ४०० उद्योगांना करोडो रुपयांचा फटका बसला आहे. आठ ते नऊ तास उद्योग बंद राहिल्याने ते पूर्ववत सुरू होईपर्यंत उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी संध्याकाळी जळगाव शहर व परिसरात अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली. यावेळी जोरदार वादळ देखील झाले व विजाही कडाडल्या. यादरम्यान, औद्योगिक वसाहत परिसरामध्ये १३२ केव्हीच्या मुख्य वीज वाहिनीवर वीज कोसळून सात तास वीज पुरवठा खंडित झाला. मुख्य वीजवाहिनी वरच वीज कोसळल्याने तारा तुटून जमिनीवर पडल्या होत्या तर मुख्य वाहिनीवर असलेल्या काही उप वाहिन्याही तुटल्या होत्या. यामुळे शहरातील विविध भागासह औद्योगिक वसाहतमध्ये देखील वीज पुरवठा खंडित झाल्याने जवळपास ४०० उद्योग चार ते पाच तास तास बंद होते. त्यानंतर ते पुन्हा सुरू होण्यास तीन चे चार तास लागल्याने आठ ते नऊ तास उत्पादन थांबले होते.

दुरुस्तीसाठी इतर ठिकाणचाही वीज पुरवठा बंदवादळामुळे औद्योगिक वसाहत परिसरातील वेगवेगळ्या सेक्‍टरमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी इतर ठिकाणचा देखील वीज पुरवठा बंद करावा लागत होता. त्यामुळे जवळपास सर्वच सेक्टरमधील उद्योगांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने बंद होता.

प्लॅस्टिक उद्योग पुन्हा सुरू होण्यास लागतो वेळजळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॅस्टिक उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शुक्रवारी वीज कोसळल्यानंतर जे व के सेक्टरमधील अनेक उद्योगांचा वीजपुरवठा खंडित झाला. या भागात प्लॅस्टिक उद्योगांची संख्या अधिक आहे. प्लॅस्टिक उद्योगांमधील मशिनरी एकदा बंद पडली तर ती पुन्हा सुरू होण्यास चार ते पाच तास लागतात. त्यात शुक्रवारी जवळपास चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित होता व त्यानंतर तो सुरू झाल्यानंतर देखील पुन्हा उद्योग पूर्ववत सुरू होण्यास चार ते पाच तास गेले. यामुळे उद्योगांना करोडो रुपयांचा फटका बसला असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या वादळामुळे वीज पुरवठा खंडित होऊन उद्योग बंद पडले. यामध्ये प्लॅस्टिक उद्योगांची संख्या अधिक होती. वीज पुरवठा खंडित झाल्याने उद्योजकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.- रवींद्र लढ्ढा, उद्योजक

शुक्रवारी औद्योगिक वसाहत परिसरामध्ये वेगवेगळ्या सेक्‍टरमध्ये वीज पुरवठा खंडित झाला‌. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी इतर सेक्टरमधील देखील वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे अनेक उद्योग बंद होते, रात्री ते पूर्ववत सुरू झाले.- रवींद्र फालक, उद्योजक.

टॅग्स :Jalgaonजळगाव