शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास जाणाºयांवर दंडात्मक कारवाई

By admin | Updated: March 9, 2017 00:21 IST

अमळनेर/चोपडा : अमळनेरात प्रत्येकी ५०० तर चोपड्यात प्रत्येकी हजार रुपये दंड, धडक मोहिमेमुळे अनेकांची दाणादाण

अमळनेर/चोपडा : स्वच्छ  महाराष्टÑ अभियानांतर्गत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. भल्या पहाटे उघड्यावर शौचास बसणाºयांची धरपकड केली तर काहींवर पाण्याच्या फवाºयाचा मारा केला, त्यामुळे अनेकांची दाणादाण उडाली. या कारवाईमुळे उघड्यावर शौचास बसणाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, अमळनेरात १९ जणांवर तर चोपड्यात पाच जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी पालिकेतर्फे प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. मात्र, तरीही अनेकजण उघड्यावर शौचास बसून, पालिकेच्या मोहिमेला हरताळ फासण्याचे काम करीत आहेत. न.पा.कर्मचाºयांनी सकाळी सहा वाजता बोरी नदीकाठ परिसरात अचानक छापे टाकले. नदीपात्रात उघड्यावर शौचास  बसणाºयांची धरपकड सुरू केली. अग्निशमन दलाचे  फवारे, पोलीस  आणि न.पा.कर्मचाºयांनी सुरू केलेली धरपकड पाहता नदीपात्रात सर्वत्र धावपळ सुरू होती. डब्ब्यांसह नदीपात्रातून नागरिक पळत होते. गांधलीपुरा, ताडेपुरा, पैलाड, किल्ला उतरती, पानखिडकी परिसरात अनेक नागरिक उघड्यावर बसलेले आढळून आले. माजी आमदार साहेबराव पाटील, मुख्याधिकारी पी. जी. सोनवणे, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिºहाडे, अरविंद कदम आणि सर्व सभापतींनी तीन अग्निशमन दल, चार ट्रॅक्टर, महिला पोलीस कर्मचारी, नगरपालिकेची जीप आणि सुमारे २०० कर्मचाºयांचा ताफा विविध ठिकाणी विभागला गेला. एकाचवेळी धरपकड सुरू झाल्याने सर्वत्र दाणादाण उडाली. उघड्यावर शौचास  बसणाºयांना  व्हॅनमध्ये बसवून पोलीस स्टेशनला जमा केले. रस्त्यालगत उघड्यावर बसणाºयांच्या अंगावर पाण्याचे फवारेही सोडले गेले.या पथकात आरोग्य सभापती संजय भिल, बांधकाम सभापती मनोज पाटील, पाणीपुरवठा सभापती राजेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर, नगरसेवक संजय कौतिक पाटील, नरेंद्र संदानशिव, विवेक पाटील यांचाही समावेश होता.१९ जणांवर गुन्हेउघड्यावर शौचास बसणारे महादुराव भवानसिंग भिल, कांतीलाल चिंधा पारधी, मगन मंगल पारधी, समाधान भगवान पाथरवट, नामदेव अशोक भिल, संदीप कुमार गौतम, अमृत दीपचंद साळुंखे, मनोहर मुकुंदा बिºहाडे, वसंत सोनू भोई, गोकूळ श्रीराम भोई, रणजित पुंडलिक महाजन, फकिरा लोटन भिल, परशुराम लोटन तिरमाळे, भिकन सुकलाल पारधी, आनंदा मोतीराम चांभार, गुलाब आत्माराम भोई, किरण गणेश भावसार, दगा भिका पाटील यांच्यावर पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलीस कायदा कलम ११५, ११७ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड दुपारी तीन वाजता सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्या. वहाब सैयद यांनी प्रत्येकी ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास दहा दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या वेळी दंडाची रक्कम कमी करण्याची विनंती न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आजच्या तारखेचा रोजगार आणि त्यात ५०० रुपयांचा भुर्दंड बसल्याने नागरिकांनी पश्चातापाची भावना व्यक्त केली. आरोपींपैकी बहुतांश जणांकडे शौचालय असल्याचे नगरपालिकेतर्फे सांगण्यात आले.चोपडाशहर हगणदरीमुक्त करण्यासाठी पालिकेने गुडमॉर्निंग पथकाची नेमणूक केली आहे. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय पाटील, फिरोज तडवी, सचिन तडवी, न.पा.कर्मचारी व्ही.के.पाटील, स्वच्छता निरीक्षक वसंत धनगर, बी.एन.पवार, अनिल चौधरी, जगदीश लाड, मनोहर बाविस्कर, दीपक घोगरे, सुपडू पारे, नवल शिरसाठ, सुनील जैस्वाल, मुन्सफखॉँ पठाण, आनंदा शिरसाठ, यांनी मोहीम राबवली. वराड रस्ता, नागलवाडी रोड, आशा टॉकीजकडील भागात उघड्यावर शौचास बसणाºया संतोष पीतांबर माळी, डिगंबर दगडू माळी (तारामतीनगर), करामतअली रहेमत अली मोहियोद्दिन गयासउद्दिन (रा. खुर्शीदअळी), नवल शिवराम करंकाळ (रा.शेतपुरा) यांच्यावर कारवाई करण्यात आली. या सर्वांना एक प्रत्येकी हजार रुपयांचा दंड केला.                            (वार्ताहर)पैलाड व पानखिडकी भागात काही नागरिकांनी न.पा.च्या अधिकारी व कर्मचाºयांशी हुज्जत घालून दमबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बहुसंख्य कर्मचाºयांच्या रास्त भूमिकेपुढे हुज्जत घालणारे नरमले. पानखिडकी परिसरातील नागरिक शौचालय असतानाही उघड्यावर जाताना आढळून आले.४ कर्मचारी माघारी परतत असताना नदीपात्रात पुन्हा शौचास बसणाºयांनी गर्दी केल्यावर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी फवारे मारले. मात्र, काही  नागरिकांनी पाण्याचा मारा सहन करूनही उठण्याची तसदी घेतली नाही.