शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा...शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी आता सहा महिन्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाची मुदत येत्या १२ फेब्रुवारी २०२१ रोजी संपत आहे. या मुदतीनंतर पुन्हा या ...

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाची मुदत येत्या १२ फेब्रुवारी २०२१ रोजी संपत आहे. या मुदतीनंतर पुन्हा या कामाला राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोरोनामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी ‘लोकमत’ला दिली. तसेच सध्या पुलाचे काम वेगानेच सुरू असून, विद्युत खांबाच्या अडथळ्यामुळे मात्र पुलाच्या बाहेरील कामाला अधिकच विलंब होत असल्याचेही सोनवणे यांनी सांगितले.

जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारणीचे काम गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. मात्र, सुरुवातीपासूनच हे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे मुदतीत हे काम पूर्ण झालेले नाही. तसेच कोरोना काळात काही महिने हे काम बंद असल्यामुळे, या कामाला अधिकच विलंब झाला आहे. १२ फेब्रुवारी २०१९ पासून सुरू झालेल्या या कामाची येत्या १२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुदत संपत आहे. मात्र, सद्य:स्थितीला पुलाच्या पायाभरणी व्यतिरिक्त कुठलेही काम पूर्ण झालेले नाही. कोरोनामुळे या कामाला विलंब झाल्यामुळे, आता या कामाला बांधकाम विभागातर्फे शासनाच्या सूचनेनुसार आणखी मुदतवाढ देण्यात येणार आहे.

इन्फो :

सहा महिन्यांची मुदतवाढ मिळणार

कोरोनामुळे जी शासकीय कामे बंद होती, अशा कामांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामालाही १२ फेब्रुवारीला मुदत संपल्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मिळणार आहे. या मुदतवाढीमध्ये संबंधित मक्तेदाराला १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुलाचे काम करणे बंधनकारक राहणार आहे.

इन्फो :

सद्या पुलाच्या पायाभरणीचे काम पूर्ण

सद्या उड्डाणपुलाचे पाया भरणीचे काम पूर्ण झाले असून, पिलर ओतण्याचे कामही अंतिम ठप्प्यात आले आहे. या कामानंतर पुढील कामाला फारसा कालावधी लागणार नाही. मात्र, टॉवर चौकाकडून जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत खांबामुळे उड्डाणपुलाच्या बाहेरील कामाला विलंब होत आहे. जर महावितरणने खांब तत्काळ हटविले, तर अवघ्या तीन ते चार महिन्यातच शिवाजी नगर उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही प्रशांत सोनवणे यांनी सांगितले.