मालती कुलकर्णी निधन वार्तानिधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:16 IST2021-01-25T04:16:50+5:302021-01-25T04:16:50+5:30

जळगाव - मालती कुलकर्णी (७५, रा.मंगलमूर्ती पार्क,देवेंदमनगर) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा ...

News of Malati Kulkarni's demise | मालती कुलकर्णी निधन वार्तानिधन वार्ता

मालती कुलकर्णी निधन वार्तानिधन वार्ता

जळगाव - मालती कुलकर्णी (७५, रा.मंगलमूर्ती पार्क,देवेंदमनगर) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. गोविंद कुलकर्णी यांच्या त्या पत्नी होत.

नंदकुमार बालाजीवाले

जळगाव : सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक नंदकुमार बालाजीवाले (८१, रा.महाबळ परिसर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. टॅक्स कन्सल्टंट महेश संत यांचे ते सासरे होत.

शिवराम बोरसे

जळगाव : बीएसएनएलचे सेवानिवृत्त कर्मचारी शिवराम बोरसे (७५, रा.हरी विठ्ठल नगर नवनाथ चौक) यांचे शनिवार दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. विकास बोरसे यांचे ते वडील होत.

मंगलाबाई वाणी

जळगाव - मंगलाबाई वाणी (६३, रा.सहयोग कॉलनी, पिंप्राळा) यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन मुले व नातवंडे असा परिवार आहे. रवींद्र वाणी यांच्या पत्नी होत.

प्रभावती कोल्हे

जळगाव -प्रभावती कोल्हे (७२, रा.रणछोड नगर) यांचे शुक्रवारी निधन झाले. जितेंद्र कोल्हे यांच्या त्या आई होत.

Web Title: News of Malati Kulkarni's demise