नव्या धोरणात मिळणार योग्यता प्राप्त करण्यासाठीचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 09:19 PM2020-08-11T21:19:34+5:302020-08-11T21:19:39+5:30

जळगाव : केंद्र सरकारकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात व्यापक विचार करण्यात आला असून केवळ गुण अथवा ...

The new policy will provide education for qualification | नव्या धोरणात मिळणार योग्यता प्राप्त करण्यासाठीचे शिक्षण

नव्या धोरणात मिळणार योग्यता प्राप्त करण्यासाठीचे शिक्षण

Next

जळगाव : केंद्र सरकारकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात व्यापक विचार करण्यात आला असून केवळ गुण अथवा पदवी प्राप्त करण्याऐवजी योग्यता प्राप्त करण्यासाठीचे शिक्षण दिले जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पात्रतेच्या विकासाला संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन गुजरातच्या वल्लभ विद्यानगर येथील सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.शिरीष कुलकर्णी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्दितीय नामविस्तार दिनानिमित्त मंगळवारी आॅनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा. बी.व्ही.पवार आदींची उपस्थिती होती.

विद्यार्थ्याच्या विश्लेषणात्मकतेला वाव मिळणार
उच्च शिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर बोलतांना प्रा.कुलकर्णी म्हणाले की, ३४ वषार्नंतर नवे शौक्षणिक धोरण जाहिर झाले आहे. हे राबवतांना आव्हाने खूप असले तरी संधी भरपूर आहेत. विद्यार्थी कच्चा राहू नये यासाठी पूर्वप्राथमिक शिक्षणापासून धोरणात विचार करण्यात आला आहे. स्थानिक मातृभाषेला महत्त्व देण्यात आले आहे. आताच्या धोरणात विद्यार्थी केवळ परीक्षार्थी आहे. नव्या धोरणात गुण अथवा पदवी मिळवण्यासाठी शिक्षण दिले जाणार नसून योग्यता प्राप्त करण्यासाठी दिले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्याला ज्या विषयाची आवड आहे ते त्याला शिकता येईल. विद्यार्थ्याच्या विश्लेषणात्मकतेला वाव मिळणार आहे. या धोरणामुळे विद्यापीठांची तीन प्रकारात वर्गवारी होणार असून एक प्रकार बहुउददेशीय विद्याशाखीय संशोधन शिक्षणाचे विद्यापीठ, दुसरा प्रकार केवळ संशोधनाचे विद्यापीठ आणि तिसरा अध्ययन व अध्यापनाचे विद्यापीठ असे तीन प्रकार राहतील. येत्या पंधरा वर्षात विद्यापीठाशी महाविद्यालये संलग्न करण्याची प्रथा बंद होऊन ही महाविद्यालये स्वायत्त (स्वनिर्भर) करण्यावर भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

भविष्यातील योजनांचा घेतला आढावा
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव विद्यापीठाला दिले गेल्याचा मनस्वी आनंद असल्याचे सांगून हा नामविस्तार इथल्या खेड्यापाड्यातील युवक युवतींशी अतूटपणे जोडला गेला आहे, असे मत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांनी व्यक्त केले़ तसेच बहिणाबार्इंच्या कर्तबगारीची विचारधारा घेऊन विद्यापीठाची वाटचाल सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठाच्या रचनात्मक कामांचा तसेच भविष्यातील योजनांचा आढावा घेतला. जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी आभार मानले.

Web Title: The new policy will provide education for qualification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.