Baba Vanga On Gold Rates: भारतात सोनं हे केवळ आभूषण नसून ती एक भावना, प्रतिष्ठा आणि संकटातील साथीदार मानलं जातं. इराण युद्ध आणि जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून गेल्या एका वर्षात किमती ८० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. सध्या किमतीत थोडी घसरण दिसत असली तरी, बाबा वेंगाची नवी भविष्यवाणी भविष्यात पुन्हा किमती वाढण्याचे संकेत देत आहे.
'बाल्कन नॉस्ट्राडेमस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगानं २०२६ सालासाठी काही भाकितं केली आहेत. त्यांच्या मते, यावर्षी जगभरात मोठे आर्थिक संकट येईल आणि बँकिंग व्यवस्था कोलमडून पडू शकते. जेव्हा लोकांचा कागदी चलनावरचा विश्वास उडेल, तेव्हा प्रत्येकजण सोन्याकडे वळेल, ज्यामुळे सोन्याची किंमत कल्पनेपलीकडे वाढू शकते.ॉ
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
दर २.१ लाख रुपयांवर पोहोचणार?
बाबा वेंगाच्या दाव्यानुसार, आर्थिक संकटाच्या काळात सोन्याच्या किमतीत २५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. जर हे अंदाज खरे ठरले, तर सध्याच्या दरानुसार १० ग्राम सोन्याची किंमत १.९ लाख ते २.१ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. २०२६ मध्येच सोने हा आकडा पार करू शकते.
जेव्हा जगात युद्धाची परिस्थिती असते, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती देतात. मध्य पूर्वेतील तणाव असूनही सध्या किमतीत झालेली किंचित घट ही मोठ्या दरवाढीपूर्वीची शांतता असू शकते, असं अनेक विश्लेषकांचे मत आहे.
मध्यमवर्गीयांची चिंता वाढली
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून सण-उत्सवांना सोन्याची मोठी खरेदी केली जाते. अशातच बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरल्यास मध्यमवर्गीयांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचा दर २ लाखांच्या पार गेल्यास सामान्य माणसासाठी सोनं खरेदी करणं केवळ स्वप्न उरेल. याचा मोठा फटका दक्षिण भारताला बसू शकतो, जिथे देशात सोन्याचा सर्वाधिक वापर होतो.
तज्ज्ञांचं काय आहे मत?
कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, सोन्याची किंमत केवळ अफवांवर ठरत नाही. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे निर्णय, रुपयाचं मूल्य आणि महागाई हे घटकही किमतीवर परिणाम करतात. युद्धामुळे अनेक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून किमती वाढल्या आहेत. युद्ध लांबलं तर सोन्यावर परिणाम होईल, मात्र तोडगा निघाला तर किमती खाली येऊ शकतात.
विश्लेषकांनी सल्ला दिला आहे की, बाबा वेंगाच्या भविष्यवाणीच्या भीतीपोटी गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारपेठेचे निरीक्षण करणं आवश्यक आहे. सोन्यात गुंतवणूक करणं सुरक्षित असलं तरी, आपल्या आर्थिक नियोजनानुसार निर्णय घेणं आणि मंदीच्या काळात टप्प्याटप्प्यान सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरू शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे.
