शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदाची दिली होती ऑफर - खडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 5:00 AM

नेहरु मैदानावर भाजपचे उमेदवार आमदार सावकारे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

भुसावळ : राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपल्यासाठी ए. बी. फॉर्म आणला होता तसेच विरोधी पक्षनेतेपदाची आॅफर दिली होती, असा गौप्यस्फोट आमदार तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी येथे केला.

नेहरु मैदानावर भाजपचे उमेदवार आमदार सावकारे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. खडसे म्हणाले, की गेल्या पाच वर्षांपासून आमदार संजय सावकारे हे माझ्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चि२त होती. उलट उमेदवारी रद्द होवू नये या भितीपोटी जवळचे व शेजारचे आमदार माझ्या जवळून पळून गेले. गेल्या काही काळात माझ्यावर अन्याय झाला मात्र चांगल्या संस्कृतीत जन्माला आलो आहे. जनता माझ्या सोबत आहे. तो पर्यंत मी उभा राहणार आहे. भाजपाने मला राज्यात ओळख दिली आहे. ६ वेळा आमदार, विरोधी पक्षनेतेपद दिले, गटनेते केले व १२ खात्यांचा मंत्रीसुद्धा केले. अशा पक्षाला मी ऐनवेळी सोडणे योग्य वाटत नसल्याने पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही.राज्यापाल पदाची दिली होती आॅफरमला उमेदवारी मिळणार नाही, अशी सूचना दोन महिन्यांपूर्वीच मिळाली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री व आपल्यात चर्चा झाली होती. मला राज्यपालपदाची आॅफर देण्यात आली होती. राज्यपाल बनून गप्प बसायचे का? जनतेला वाऱ्यावर सोडायचे का? असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसbhusawal-acभुसावळ