शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन कर्मचारी परीक्षेदरम्यान परीक्षार्थ्याकडे आढळला मोबाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 00:43 IST

पोलिसांनी घेतले ताब्यात, शहरात २० केंद्रांवर परीक्षा...

जळगाव : न्यायालयीन कर्मचारी भरती प्रक्रियेंतर्गत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेदरम्यान जळगावातील एका केंद्रावर नितीन भोजराज राठोड या परीक्षार्थ्याकडे मोबाईल आढळला. त्याला जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने रविवारी (२६ एप्रिल) राज्यभरात लिपिक, शिपाई, वाहनचालक या पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. यात जळगाव शहरात २० केंद्रांवर ही परीक्षा झाली. यातील गणेश कॉलनीमधील प.न. लुंकड कन्या शाळेच्या केंद्रावर नितीन राठोड हा परीक्षा देत असताना त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पर्यवेक्षकांनी त्याची झडती घेतली. त्या वेळी त्याच्याकडे मोबाईल आढळला. परवानगी नसताना या परीक्षार्थीने परीक्षा केंद्रात मोबाईल नेल्याचे आढळताच जिल्हा पेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. त्या वेळी प्रभारी सागर शिंपी व त्यांचे सहकारी परीक्षा केंद्रावर पोहचले. त्यांनी सदर परीक्षार्थीस ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.या प्रकारानंतर न्यायाधीश व अन्य अधिकारी पोलिस ठाण्यात दाखल झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेचे जळगावात जिल्हा न्यायालयाने नियोजन केले होते. त्यात जळगाव शहरात २० केंद्रावर ही परीक्षा झाली. यासाठी एकूण २० हजार २४० परीक्षार्थी होते. त्यापैकी जवळपास ९५ टक्के परीक्षार्थी हजर होते. एकेका परीक्षा केंद्रावर प्रत्येकी ३ पोलिस कर्मचारी, अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात होते. तसेच जिल्हा न्यायालयाच्यावतीने परीक्षार्थींसाठी वाहतूक व्यवस्था  करण्यात आली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Mobile Found with Candidate During Court Employee Exam in Jalgaon

Web Summary : A candidate, Nitin Rathod, was caught with a mobile phone during a court employee recruitment exam in Jalgaon. Police took him into custody after supervisors found the device during inspection at the Ganesh Colony center. The exam, conducted by the Mumbai High Court, saw high attendance.
टॅग्स :examपरीक्षाPoliceपोलिसStudentविद्यार्थी