शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कुतुहल जागृत ठेवून स्वत:ला घडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 21:10 IST

अच्युत गोडबोले : ‘मी कसा घडलो?’ याविषयावर मार्गदर्शन

जळगाव : मी तज्ज्ञ वगैरे काही नाही. अजूनही स्वत:ला विद्यार्थीच समजतो. आजच्या शिक्षणात शिक्षकसुध्दा विद्यार्थी राहिलेले नाहीत. कारण कुतुहलच संपून गेलं. आपल्यातील कुतुहल आपण मारून टाकतो, त्यामुळे आपण कसेबसे आयुष्य जगत आहोत, अशा शब्दात ज्येष्ठ लेखक, आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी ‘मी कसा घडलो?’ या विषयावर मार्गदर्शन केले.नोबेल व भरारी फाऊंडेशनतर्फे ‘मी कसा घडलो?’ या विषयावर गोडबोले यांचे व्याख्यान झाले. उद्योजक रजनीकांत कोठारी, जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, नंदलाल गादीया, सपन झुनझुनवाला, भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, एस. जे. पाटील, सा.बां. विभागाचे डेप्युटी इंजिनिअर सुभाष राऊत, संजय शेखावत आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. नरसिंग परदेशी-बघेल लिखित ‘मध्ययुगीन भारतातील बिकानेर-महाराष्ट्र संबंध’, डॉ. युवराज परदेशी लिखीत ‘आऊट आॅफ बॉक्स’, प्रियंका पाटील लिखित ‘कलामांचे विचारधन’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन नोबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील यांनी केले. नंदूरबारमधील शहादा येथे आदिवासींच्या हक्काबाबत आंदोलन करताना आपणास १० दिवस करागृहात पाठविण्यात आले. तिथे एका बाजूला २ खून केलेले आरोपी होते, दुसऱ्या बाजूला ३ खून केलेले आरोपी. मी त्यावेळी खून केलेल्या एकूण १२ जणांच्या मुलाखती घेऊन त्यांचं आयुष्य, मानसिकता समजून घेतली. त्यावेळी एकाने खिसा सहा तºहेने कसा कापता येतो, हे दाखवले. आता मला त्यात करिअर करायचे नव्हते, म्हणून लक्ष दिले नाही, असे सांगताच हशा पिकला.४आयआयटीमध्ये असताना माझ्या इंग्रजी बोलण्यावरून मला हिणवले गेले. त्याचा मला प्रचंड राग आला आणि पुढचे सहा महिने मी इंग्रजी शिकण्यावरच भर दिला. अनेकजण इंग्रजी शब्द पाठ करतात आणि बोलताना भाषांतर करून बोलतात. मी तसं केलं नाही, माझे विचार मी इंग्रजीतूनच मांडायला सुरुवात केली.त्यामुळे इंग्रजी पक्के झाले. मी पुढे टोकियो, न्यूयार्क, लंडनमध्ये व्याख्याने दिली. टोकियोतील एका कार्यक्रमाचे जगभरात प्रसारण होणार होते. त्या कार्यक्रमाच्या दुसºया दिवशी न्यूयॉर्कमधील एका वृत्तपत्रात माझ्या त्या कार्यक्रमाची मोठी बातमी छापून आली होती, हे सगळं माझ्यातील ‘मी’पणा गळून पडल्याने आणि कुतुहल जागृत ठेवल्याने झालं, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पहिल्या नोकरीपासून आपला प्रवास खुमासदार शैलीत उलगडला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव