शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराची धमकी देत जळगावात दाम्पत्याला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 11:13 IST

रायसोनी नगरातील थरारक घटना.सुरक्षारक्षकाला मारहाण करून धारधार शस्त्राचा दाखविला धाक

 ऑनलाईन लोकमत 

जळगाव,दि.24 -पोलीस असल्याचे सांगत तोंडाला रूमाल बांधून आलेले दोन चोरटे बंगल्यात शिरल़े तेथील सुरक्षा रक्षकाला मारहाण करीत व धारदार शस्त्राचा धाक दाखवित व  मुलीवर बलात्काराची धमकी देत मंगळसूत्र  व पैसे घेऊन चोरटय़ांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास रायसोनीनगरात घडली. महिलेने आरडाओरड केल्याने हा प्रकार उघडकीस आला व चोरटे पसार झाल़े
शिवसेना महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा मंगला बारी यांचा रायसोनी नगरात गट नं.458, प्लॉट नं 36 येथे बंगला आह़ेया बंगल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून फर्निचरचे काम सुरू आह़े बांधकाम सुरू असल्यापासून बारी यांनी याठिकाणी मध्यप्रदेश येथील रोहीदास जाधव हा सुरक्षारक्षक ठेवला आह़े त्याला राहण्यासाठी बंगल्याच्या तळमजल्यावर खोली आह़े खाजगी कामानिमित्ताने सात ते आठ दिवसांपासून जाधव गावाकडे गेलेले आहेत़ 
गावाकडे गेलेले जाधव यांचा अपघात झाल्याने त्यांनी त्याच्या जागी त्यांचा शालक भिमा बुधा राठोड यांना सुरक्षारक्षक म्हणून जळगावला पाठविल़े भिमा राठोड हे पत्नी सविता व दोन मुलांसोबत चार ते पाच दिवसांपूर्वीच जळगावात आल़े 
140 रुपयेही हिसकावले
शुक्रवारी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास राठोड दाम्पत्याला लुटले. चोरटय़ांच्या हातात मंगळसूत्र पडताच त्यांनी पैशांची मागणी केली़ भिमा राठोड यांनी त्यांच्या खिशातील शंभर रुपये तर त्यांच्या पत्नी सविता यांनी त्यांच्याकडील चाळीस रुपये घेतल़े
महिला आरडाओरड करत बंगल्याबाहेर पळाली
सविता राठोड यांनी दोघांपैकी एकाकडे बंगल्याच्या चाव्या देत आरडाओरड केली व जवळच बांधकाम ठिकाणी सुरक्षारक्षक असलेल्या नातेवाईक अजमल राठोड व सदाशिव राठोड यांच्याकडे पळत सुटल्या़ राठोड यांचे नातेवाईक व बंगल्यासमोरील रहिवासी पंकज भावसार हे बारी यांच्या बंगल्याजवळ जमल़े भावसार यांनी कन्हैया बारी यांना मोबाईलवर संपर्क साधला़ मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही़ अखेर भावसार यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फोन केला व मारहाण करून लुटल्याची माहिती दिली.