शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

खेडगाव येथील जवानाला दिला अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 11:10 PM

खेडगाव येथील आयटीबीपी जवान सुनील यशवंत हिरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देशासकिय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

गुढे, ता. भडगाव  :  खेडगाव येथील आयटीबीपी जवान सुनील यशवंत हिरे हे दिनांक २२ रोजी अरुणाचल येथे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. दिनांक २४ रोजी खेडगाव येथे लागून असलेल्या माळरानात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक हजर होते. आपल्या लाडक्या सुपुत्राला  अश्रूंनयनांनी मानवंदना गाव व परिसर वासियांनी दिली. गावाच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी खेडगावातील तरुण मित्र, विद्यार्थी, विद्यार्थिनी आबालवृद्ध व गावी सुट्टीवर आलेल्या जवानांनी  तीन दिवसापासून  तयारी केली होती.

फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवरुन अंतयात्रा काढण्यात आली. संपूर्ण गावात रस्त्यावर रांगोळ्या काढून फुलांनी सजवल्या होत्या . अंत्ययात्रेदरम्यान  ‘वीजवान तुझे सलाम’, ‘वीरजवान अमर रहे’ च्या घोषनांनी परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण खेडगाव परिसरात शोककळा पसरली होती.सुनील हिरे हे २२ वर्षापासून देश सेवेत कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व एक बारा वर्षाचा तर एक आठ वर्षाचा मुलगा, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.

 खान्देशातील निवृत्त झालेले सर्व माजी सैनिक तसेच सुट्टीवर घरी आलेले सैनिकांनी अंत्ययात्रेबाबत नियोजन केले. खान्देश रक्षक  रंक्षक संस्थेच्या सदस्यांनी सहकार्य केले.तीन दिवसापासुन आपल्या लाडक्या सुपुत्राच्या अंत्यविधीच्या स्थंळाची सजावट खेडगावकंरानी एक दुसऱ्याला धीर देत  केली होती.

अंत्यविधीसाठी वापरल्या गौऱ्या

अमळनेर गौशाळेच्या पर्यावरणपूरक गौऱ्यांनी अंत्यविधी पार पडला. आयटीबीच्या जवानांनी तसेच भडगाव पोलिसांच्या वतीने मानवंदना तसेच सलामी देण्यात आली . अखेरचा निरोप देण्यासाठी आमदार किशोर पाटील , प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सागर ढवळे , पोलीस निरीक्षक अशोक उतेकर आदी उपस्थित होते. ते लोकमतचे वार्ताहर संजय हिरे यांचे चुलत भाऊ होते.

टॅग्स :JalgaonजळगावBhadgaon भडगावSoldierसैनिकDeathमृत्यू