हायमास्ट लॅम्पच्या स्विचपेटीला दोरं बांधून मजुराने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 01:06 PM2019-11-21T13:06:08+5:302019-11-21T13:06:21+5:30

रावेर- रावेर तालुक्यातील खानापूर येथील शेतमजूर कैलास देवराम पाटील (वय-४७) यांनी गत परतीच्या अवकाळी पावसापासून हाताला काम नसल्याने संसाराचा ...

 The laborer grabbed the switchpost of the Highmast Lamp and tied the rope | हायमास्ट लॅम्पच्या स्विचपेटीला दोरं बांधून मजुराने घेतला गळफास

हायमास्ट लॅम्पच्या स्विचपेटीला दोरं बांधून मजुराने घेतला गळफास

Next

रावेर- रावेर तालुक्यातील खानापूर येथील शेतमजूर कैलास देवराम पाटील (वय-४७) यांनी गत परतीच्या अवकाळी पावसापासून हाताला काम नसल्याने संसाराचा रहाटगाडा हाकणे जिकरीचे ठरल्याने नैराश्यापोटभ थेट श्री कानिफनाथ महाराज देवस्थान मंदिरासमोरील हायमास्ट लॅम्पच्या स्विचपेटीला दोरं बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैर्वी घटना घडली. ही घटना गुरूवारी मध्यरात्री १२़३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसात करण्यात आली आहे़

कैलास पाटील हे खानापूर येथे पत्नी व मुलांसह वास्तव्यास होते़ शेतमजुरी करून ते आपल्या संसाराचा रहाटगाडा हाकत होते. दुदैर्वाने, परतीच्या अवकाळी पावसाने तिघांच्याही हाताला काम नसल्याने, आज कमवाल तर उद्या भाकरीचा चंद्र दिसेल.. अशा विदारक परिस्थितीत संसारातील अडचणींचा ताण आल्याने नैराश्यातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैर्वी घटना घडली. यावेळी त्यांनी श्री कानिफनाथ महाराज देवस्थानच्या हायमास्ट लॅम्पच्या स्विचपेटीला दोर बांधून गळफास घेत जीवनयात्रा संपविली़ याप्रकरणी विकास मोतीराम पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ एन डी महाजन व डॉ श्रीमती स्वप्निशा पाटील यांनी शवविच्छेदन केले. शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत़

Web Title:  The laborer grabbed the switchpost of the Highmast Lamp and tied the rope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.