शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात आठवडाभरात सारीचे मृत्यू निम्म्याने घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना काळातील निर्बंध व तीन नियम यामुळे कोरोनाच नव्हे तर अन्य विषाणूजन्य ...

आनंद सुरवाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना काळातील निर्बंध व तीन नियम यामुळे कोरोनाच नव्हे तर अन्य विषाणूजन्य आजारही नियंत्रणात येत आहेत. कोरोना घटत असताना सारी या आजाराचे मृत्यूही घटले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सारीच्या मृत्यूंमध्ये निम्म्याने घट झाली आहे. १७ ते २४ मे दरम्यान जिल्ह्यात ३६ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.

दुसऱ्या लाटेच्या मध्यंतरी कोरोनापेक्षा सारीने अधिक मृत्यू होत असल्याचे समोर आले होते. सारी अर्थात सिव्हीअर ॲक्युट रेस्पीरेटरी इन्फेक्शन या आजाराचे पहिल्या लाटेतही मृत्यू होत होते. मात्र, त्यांचे प्रमाण नियंत्रणात होते. दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाचा जोर असताना मृत्यूंचे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा अधिक वाढलेले होते. यात सारी या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले होेते. या मृत्यूची नोंद, सारी, कोरोना संशयित किंवा न्यूमोनिया अशा पातळ्यांवर शासकीय यंत्रणेत केली जात आहे. मध्यंतरी दिवसाला २० ते २२ रुग्णांचा मृत्यू हा सारी, कोरोना, संशयित, न्यूमोनिया यामुळे हाेत होता.

नंतर सुरू झाली नोंद

कोविडमध्ये समोर येणारी मृतांची संख्या व प्रत्यक्षात होणाऱ्या अंत्यसंस्कारांची संख्या यात प्रचंड तफावत समोर आल्यानंतर यात अधिकांश मृत्यू हे कोरोना संशयित रुग्णांचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यात सारीची संख्या अधिक होती. सारी व कोरोनात श्वास घ्यायला त्रास होणे हे लक्षण सारखे असल्याने याची नोंद कोरोना संशयित म्हणूनही होत होती. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासनाकडून सारी, कोरोना संशयित रुग्णांची शासकीय अहवाला नोंद करण्यात येत आहे.

आठवडाभरात ३६ मृत्यू

१७ मे ६

१८ मे ६

१९ मे ६

२० मे ४

२१ मे ४

२२ मे ५

२३ मे ३

२४ मे २

मागील आठवड्यात ६७ मृत्यू

९ मे ११

१० मे ९

११ मे ९

१२ मे ८

१३ मे ९

१४ मे ७

१५ मे ८

१६ मे ७

कोट फ्ल्यू

सारी हा फ्ल्यूचा एक प्रकार आहे. त्यामुळे मास्क परिधान करणे, हात वारंवार धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या नियमांमुळे आपण केवळ कोरोनाच नाही तर अन्य विषाणूजन्य आजारांना दूर ठेवू शकतो. त्यामुळे सारीचे मृत्यू व रुग्णही कमी येत आहेत. यासह कॉलरा, टायफाइड, टीबी अशा आजारांचा प्रसारही कमी होणार आहे. त्यामुळे आता मास्क, हात धुणे व डिस्टन्सिंग पाळणे ही नागरिकांनी जीवनशैली बनवून घ्यावी, त्यामुळे कोरोना, सारी तर दूर राहीलच, मात्र इतर आजारांपासूनही तुमचे संरक्षण होणार आहे.

- डॉ. किशोर इंगोले, विभागप्रमुख, सूक्ष्म जीवशास्त्र विभाग