शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयच्या प्राचार्याचा भार त्यात आठ अतिरिक्त पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एक किंवा दोन कार्यालयांचा अतिरिक्त कार्यभार देण्‍यात आला आहे, असे आपण नेहमीच ऐकतो. पण, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एक किंवा दोन कार्यालयांचा अतिरिक्त कार्यभार देण्‍यात आला आहे, असे आपण नेहमीच ऐकतो. पण, जळगाव शहरातील शासकीय मुलींचे आयटीआयचे प्राचार्य ए.आर.राजपूत यांच्याकडे तब्बल सात संस्थांचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे नियमित भार त्यात अतिरिक्त पदभार अशी अवघडलेली अवस्था झाली आहे.

प्राचार्य राजपूत यांची नियमित नेमणूक मुलींची शासकीय आयटीआयमध्‍ये असून त्यांच्याकडे वरणगाव, जळगाव, मुक्ताईनगर, भुसावळ येथील टेक्नीकल महाविद्यालयाचा तर उचंदा, जोंधनखेडा, भुसावळ आयटीआय महाविद्यालयांचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आहे. दरम्यान, वरणगाव व जळगाव तांत्रिक महाविद्यालयांचा पदभार हा दुस-या अधिका-यांना देण्‍याबाबत आदेश पारित झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय बंद असल्यामुळे लवकरचं संबंधित अधिका-यांना तो पदभार सोपविण्‍यात येणार आहे.

१८ प्राचार्यांची पदे रिक्त

कौशल्य विकास व उद्योजकता विभागातंर्गत येणा-या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित जळगाव जिल्ह्यात २१ शासकीय आयटीआय व तांत्रिक महाविद्यालय कार्यरत आहेत. त्यामध्ये १६ शासकीय आयटीआय व ५ तांत्रिक महाविद्यालयांचा समावेश आहे. मात्र, या २१ महाविद्यालयांमध्‍ये तब्बल १८ वरिष्ठ व कनिष्ठ प्राचार्यांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाने गेल्या काही वर्षांपासून रिक्त पद न भरल्यामुळे सध्या आयटीआय व तांत्रिक महाविद्यालयांमध्‍ये सुध्दा प्रभारी राज सुरू आहे. काहींकडे तर अतिरिक्त कारभार सुध्दा देण्‍यात आला आहे.

दोन प्रशासकीय अधिकारी पदे रिक्तदरम्यान, शासकीय आयटीआय व तांत्रिक महाविद्यालयांमध्ये दोन प्रशासकीय अधिकारी पदे सुध्दा रिक्त आहेत. दुसरीकडे तांत्रिक महाविद्यालयांमध्‍ये प्राचार्य नसल्यामुळे प्रभारी कारभार सुरू आहे. दोन्ही संस्थांमध्‍ये रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर या जागा त्वरित भरण्‍यात याव्यात अशी मागणी होत आहे.

अशा आहेत रिक्त जागा

वर्ग - १ : वरिष्ठ प्राचार्यांची ०२ पदे

वर्ग - १ : कनिष्ठ प्राचार्यांची ०८ पदे

वर्ग - २ : प्राचार्यांची ०८ पदे

प्रशासकीय अधिकारी : ०२ पदे