Indian Youth Democracy Janakranti Morcha launches eye-catching fast | भारतीय युवा लोकशाही जनक्रांती मोर्चातर्फे लक्षवेधी उपोषण
भारतीय युवा लोकशाही जनक्रांती मोर्चातर्फे लक्षवेधी उपोषण


जळगाव- ओला दुष्काळ जाहीर करावा, जळगाव शहर खड्डे मुक्त करून रस्त्यांची पुर्ननिर्मिती करावी, जळगाव शहर सुरक्षित स्वच्छ आणि सुंदर करून कचरा कुंडी मुक्त करावी यासह विविध मागण्यांसाठी भारतीय युवा लोकशाही जनक्रोती मोर्चातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षवेधी उपोषण करण्यात आले.
सकाळी ११ वाजेपासून उपोषणाला सुरूवात झाली़ त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून चर्चा करण्यात आली़ त्यानंतर दुपारी ४ वाजता उपोषणाची सांगता करण्यात आली़ या उपोषणात प्रा़ डॉ़ आशिष जाधव, ईश्वर मोरे, अशफाक पिंजारी, अनिल नाटेकर, अमोल कोल्हे, गुरूनाथ सैंदाणे, उमाकांत वाणी, शिवराम पाटील, राकेश वाघ, दीपक गुप्ता, डॉ़ सुभाष देशमुख आदींचा सहभाग होता.

Web Title: Indian Youth Democracy Janakranti Morcha launches eye-catching fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.