शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
2
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
3
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
4
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
5
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
6
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
7
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
8
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
9
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
10
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
11
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
12
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
13
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
14
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
15
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
16
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
17
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
18
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
19
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
20
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

जळगाव जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 9:40 PM

चोपडा रस्त्यावर वृक्ष पडले : लिंबूच्या आकाराच्या गारमुळे रब्बी हंगाम झोपला

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जिल्हाभरात मंगळवार १७ रोजी दुपारी साडे चार वाजेपासून अवकाळी पाऊस व गारपीटला सुरुवात झाली. यामुळे रब्बी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास पुन्हा अवकाळी पावसामुळे हिरावला गेला आहे.बोदवड शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास वादळ व त्या पाठोपाठ गारांचा पाऊस झाल्याने बाजारपेठत पळापळ झाली. या पावसाने गहू, हरभरा, मक्याच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच ऐनपूर व विवरा परिसरात देखील वादळी पाऊस झाला.जामनेर तालुक्यातील तळेगावसह परिसरात अवकाळी पावसासह गारपीट व वादळी वाºयामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे गहू, हरभरा, मका वादळी वाºयासह गारपीट झोडपल्याने मोठे नुकसान झाले. टरबूज शेतीचेही प्रमाणात नुकसान झाले आहे. पहूर येथे दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजरी लावली. तर अमळनेर येथेही पावसाने हजेरी लावली. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.चोपडा तालुक्यात संध्याकाळी लिंबूच्या आकाराची गारपीट झाली.लासूर, गणपूर, चोपडा, माजवड, बिडगाव, अडावद, धानोरा परिसरात वादळी पाऊस झाला. वेले ते चोपडा सुतगिरणी रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडली. तर चोपडा यावल बापू डेअरीजवळ झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावलसह दहिगाव येथे रात्री वादळी पाऊस झाला. तर रावेर, चांगदेव, पाडळसे परिसरात देखील वादळी पाऊस झाला.धुळे जिल्ह्यात लिंबूच्या आकाराची गारधुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान अधार्तास वादळी वाºयासह गारपीट झाली. लिंबूच्या आकाराच्या गारपीटमुळे शिरपूर शहरातील काही घरांच्या खिडक्यांचे काचदेखील फुटले .