गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध पकड वॉरंट

By Admin | Updated: October 8, 2014 11:43 IST2014-10-08T11:43:09+5:302014-10-08T11:43:09+5:30

अँट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी व माजी आमदार गुलाबराव पाटील हे न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्यासह तीन जणांविरुद्ध न्या.डी.जे.शेगोकार यांनी पकड वॉरंट मंगळवारी काढले.

A grip warrant against Gulabrao Patil | गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध पकड वॉरंट

गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध पकड वॉरंट

जळगाव : पाळधी येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार रॅलीच्या दरम्यान झालेल्या वादातून दाखल अँट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी व माजी आमदार गुलाबराव पाटील हे न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्यासह तीन जणांविरुद्ध न्या.डी.जे.शेगोकार यांनी पकड वॉरंट मंगळवारी काढले.

पाळधी गावात १३ मार्च २00८ रोजी पाळधी विकास पॅनलतर्फे मंदाबाई यांच्याविरोधात अलकाबाई प्रकाश पाटील या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. दोन्ही उमेदवारांची प्रचार फेरी समोर आल्यानंतर फिर्यादी चंद्रशेखर साळुंखे व त्यांच्या भावाला माजी आमदार गुलाबराव पाटील, अलका पाटील, आलिम उर्फ संजय देशमुख, आबा पाटील, गणेश पाटील, राकेश पाटील, लहानू पाटील, शाहूबाई पाटील, सुपडाबाई पाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली होती. या प्रकरणी १६ मार्च रोजी पाळधी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज न्या. शेगोकार यांच्या कोर्टात मंगळवारी होते. 
या खटल्यात गुलाबराव पाटील, संजय देशमुख व अन्य एक आरोपी गैरहजर होता. न्यायालयाने त्याबाबत विचारणा केली. अखेर न्यायालयाने तिघांविरुद्ध पकड वॉरंट काढले. मात्र संजय देशमुखसह अन्य एक आरोपी न्यायालयात हजर होत हे वॉरंट रद्द केले. गुलाबराव पाटील हे बुधवारी हजर राहण्याची शक्यता आहे. सरकारतर्फे अँड.बी.के.शिंदे यांनी फिर्यादीतर्फे अँड.हरुल देवरे तर आरोपीतर्फे अँड.सुनील चौधरी यांनी काम पाहिले.

Web Title: A grip warrant against Gulabrao Patil