शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या भावात ४०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:43 IST

भारतीय रुपयातील घसरणीचा परिणाम

जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव वाढण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे सोन्याचे भाव एकाच दिवसात ४०० रुपये प्रती तोळ््याने वाढून ३८ हजार ७०० रुपयांवर तर चांदीचे भाव ५०० रुपये प्रती किलोने वाढून ४५ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहेत.दिवाळी काळात खरेदी वाढल्याने मोठी भाव वाढ झालेल्या सोन्या-चांदीच्या भावात घसरण होऊन दहा दिवसात सोन्याच्या भावात ८०० रुपये प्रती तोळा तर चांदीच्या भावात दीड हजार रुपये प्रती किलोने घट झाली होती. त्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी सोन्याचे भाव ३८ हजार ३०० रुपये प्रती तोळ््यावर आले होते तर चांदीचे भाव ४५ हजार रुपये प्रती किलोवर आले होते. मात्र आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव वाढण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण झाल्यामुळे सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वधारले आहेत.१२ नोव्हेंबर रोजी ७१.७४ रुपयांवर असलेले अमेरिकन डॉरलचे दर ७२ रुपयांवर पोहचल्याने सोन्याचे भाव ४०० रुपये प्रती तोळ््याने वाढून ३८ हजार ७०० रुपये प्रती तोळा तर चांदीत ५०० रुपये प्रती किलोने वाढून ४५ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहेत.लग्नसराईच्या खरेदीसाठी गर्दीतुलसी विवाह होताच लग्नसराईची लगबग सुरू झाल्याने सोने-चांदीच्या खरेदीला वेग आला असून भाववाढ होत असली तरी खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र सुवर्णनगरीत आहेत. लग्नतिथी जसजशा जवळ येतील तसतशी खरेदीसाठी गर्दी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव वाढण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे भारतात सोने-चांदीचे भाव वाढले आहेत. सध्या खरेदीसाठी गर्दी वाढत असून लग्नसराईमुळे ही गर्दी आणखी वाढू शकते.- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव