शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

धनत्रयोदशीला सोन्याला ‘झळाली’, मागणी वाढल्याने एकाच दिवसात सोन्याचे भाव ७०० रुपयांनी वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 11:57 IST

रात्रीपर्यंत सुवर्णपेढ्यांमध्ये मोठी गर्दी

जळगाव : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगाव येथे सोने खरेदीसाठी मोठी गर्दी होऊन करोडो रुपयांची उलाढाल झाली. नवरात्रोत्सवापासून सुरू असलेला सुवर्णखरेदीचा उत्साह अद्यापही कायम असून धनत्रयोदशीला ‘सुवर्णनगरी’ गजबजून गेली होती. दरम्यान, २५ आॅक्टोबर रोजी एकाच दिवसात सोन्याच्या भावात ७०० रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन सोने ३९ हजार ५०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. चांदीच्याही भावात एक हजार तीनशे रुपये प्रती किलोने वाढ झाली.रात्रीपर्यंत गर्दीजळगावातील सोने देशभर प्रसिद्ध असल्याने येथे तशी नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. त्यात यंदा भाव कधी नव्हे एवढे वाढले तरी सोन्याची मागणी कायम आहे. नवरात्रोत्सवापासून सोने खरेदीला झालेली सुरुवात अद्यापही कायम असून धनत्रयोदशीला सोने खरेदीला मोठे महत्त्व असल्याने या दिवशी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी ११ वाजेपासून सुवर्णपेढींमध्ये मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली, ती रात्रीपर्यंत कायम होती.सर्वच प्रकारच्या अलंकारांना मागणीशहरात सोने खरेदी करताना सर्वच प्रकारच्या दागिन्यांना मागणी दिसून आली. धनत्रयोदशीला सोने खरेदी करायची असल्याने अनेकांनी जुन्या दागिन्यांची मोड देऊन मंगळसूत्र, अंगठी व इतर दागिने करण्यास पसंती दिली. या सोबतच अनेकांनी एक ग्रॅम सोने तरी खरेदी करून ठेवले. शहरातील १५०च्या वर असलेल्या सुवर्ण पेढींमधून उलाढालीचा नक्की आकडा मिळाला नसला तरी करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.एकाच दिवसात मोठी वाढअमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण झाली की सोन्याचे भाव वधारतात. मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी डॉलरचे भाव ७१ रुपयांवरून घसरुन ७०.८६ रुपयांवर आला तरी सोन्याचे भाव वधारले. प्रचंड मागणी वाढल्याने हे भाव वाढल्याचे सांगण्यात आले. २४ आॅक्टोबर रोजी ३८ हजार ८०० रुपये प्रती तोळ््यावर असलेल्या सोन्याच्या भावात एकाच दिवसात ७०० रुपये प्रती तोळ््याने वाढून हे भाव ३९ हजार ५०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. सोबतच चांदीचेही भाव एकाच दिवसात १३०० रुपये प्रती किलोने वाढून ते ४७ हजार ५०० रुपयांवरून ४८ हजार ८०० रुपयांवर पोहचले.धनत्रयोदशीला सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. सकाळपासून असलेली गर्दी रात्रीपर्यंत कायम होती. विशेष म्हणजे सोने-चांदीचे भाव एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात वाढले.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव