शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बी.पी.पाटील "मुक्त"चे परीक्षा संचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रा.पी.पी.पाटील यांच्या राजीनाम्यानंतर विद्यापीठात सद्यस्थितीला प्रभारी राज सुरू आहे. आता विद्यापीठातील परीक्षा संचालक डॉ.बी.पी.पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : प्रा.पी.पी.पाटील यांच्या राजीनाम्यानंतर विद्यापीठात सद्यस्थितीला प्रभारी राज सुरू आहे. आता विद्यापीठातील परीक्षा संचालक डॉ.बी.पी.पाटील यांची नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा मंडळ संचालक पदावर नियुक्ती करण्‍यात आली आहे. परिणामी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रभारी राजमध्ये आणखी भर पडणार आहे. दरम्यान, हळूहळू एक-एक अधिकारी विद्यापीठातून जात आहेत. हे कुणाला कंटाळून जात आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू भंगाळे यांनी केली आहे.

१० एप्रिल रोजी मुक्त विद्यापीठात परीक्षा संचालकासाठी मुलाखती झाल्या होत्या. त्याठिकाणी डॉ.बी.पी.पाटील यांनी मुलाखत दिली होती. पाटील यांची नियुक्ती झाल्याची घोषणा सुध्दा प्रभारी कुलगुरू ई.वायुनंदन यांनी पदवी प्रदान व कुलगुरू निवडीच्या बैठकीत केली आहे, अशी माहिती विष्णू भंगाळे यांनी दिली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३ मे रोजी पदवी प्रदान समारंभ होणार आहे आहे. त्यानंतर ते मुक्त विद्यापीठातील पदभार स्वीकारणार आहेत. सध्या एक-एक अधिकारी विद्यापीठातील पदभार सोडून जात आहे. प्रमुख पदांवर प्रभारी राज सुरू आहे. परीक्षा संचालक पद रिक्त झाल्यावर ठिकाणी प्रभारी अधिकारी पदभार स्वीकारेल. असे होत गेले तर विद्यापीठाल घरघर लागेल. त्यामुळे विद्यापीठातील अधिकारी कुणाला कंटाळून जात आहेत व ही प्रक्रिया कुणाच्या इशा-याने पार पडली, याची चौकशी करण्‍यात यावी, अशी मागणी विष्णू भंगाळे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे.