जिल्हा बँकेची निवडणूक 'बिनविरोध'चा निर्धार
By Admin | Updated: March 2, 2015 12:57 IST2015-03-02T12:57:00+5:302015-03-02T12:57:00+5:30
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी सकाळी जिल्हा बँकेत घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला.

जिल्हा बँकेची निवडणूक 'बिनविरोध'चा निर्धार
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी सकाळी जिल्हा बँकेत घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला. उमेदवार निश्चितीसाठी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय पाच सदस्यांची समितीही गठित करण्यात आली. आठ ते दहा दिवसात आणखी एक बैठक घेण्यात येणार असल्याचे खडसे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
|