Debate Competition at Raisoni College | रायसोनी महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा
रायसोनी महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा

जळगाव- जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातील टोस्ट मास्टर क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत व्यवस्थापन विभागातील पियुष हसवाणी व सोमनाथ गुंडाळे या विध्याथ्यार्नी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
यावेळी सहभागी विध्याथ्यार्नी काश्मीरमध्ये कलम ३५ अ आणि ३७० हटविल्याने बदल घडेल का? या विषयावर वादविवाद करून सकारात्मक व नकारात्मक विचार मांडले. यावेळी सदर स्पर्धेच्या परीक्षकांनी सहभागी विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य, प्रेक्षकाभिमुख वक्तृत्व, वेळेचे नियोजन, मुद्धेसूद मांडणी या बाबीचा विचार करून सदर स्पधेर्चे परीक्षण केले. स्पर्धेत तेजस पाटील, शाहनवाज शेख यांनी द्वितीय तर खुशी रावलानी व सेजल किग्ररानी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. स्पधेर्चे प्रा. राज कांकरिया व डॉ. दिपक शर्मा यांनी परीक्षण केले तर प्रा. तन्मय भाले व प्रा. प्रिया टेकवाणी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू , रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद खराटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रीतम रायसोनी यांनी विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.


Web Title: Debate Competition at Raisoni College
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.