दत्तात्रय कराळे जळगावचे नूतन पोलीस अधीक्षक

By Admin | Updated: April 28, 2017 13:16 IST2017-04-28T13:16:13+5:302017-04-28T13:16:13+5:30

डॉ़ सुपेकर नाशिक पोलीस अकादमीच्या अधीक्षकपदी : मोक्षदा पाटील वाशिमच्या पोलीस अधीक्षक

Dattatray Karale, Nalan Superintendent of Jalgaon | दत्तात्रय कराळे जळगावचे नूतन पोलीस अधीक्षक

दत्तात्रय कराळे जळगावचे नूतन पोलीस अधीक्षक

 जळगाव,दि.28- जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर यांची नाशिक पोलीस अकादमीच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी नाशिक शहर उपायुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती झाली. तर अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची पदोन्नतीवर वाशिम पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

जिल्ह्यात तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने गृह विभागाच्या आदेशानुसार येथील पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांची बदली झाली आह़े गृह विभागाने याबाबतचे आदेश नुकतेच पारीत केले आहेत़ येथील अप्पर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची पदोन्नतीवर वाशिम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी पैठणचे सहाय्यक पोलीस अधीक्षक बच्चन सिंग हे बदलून येणार आहेत़

Web Title: Dattatray Karale, Nalan Superintendent of Jalgaon