शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

दाम्पत्याला मारहाण करुन लुटले अन् तेथेच आढळला तरुणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:54 AM

रामदेववाडी शिवारात थरार : जखमींनी लुटारुंना ओळखले; दोघांना घेतले ताब्यात

जळगाव / शिरसोली : जळगाव येथून उत्राण, ता.एरंडोल येथे घरी जाणाऱ्या दिलीप काशिनाथ पाटील (३०) व नेहा दिलीप पाटील (२६) या दाम्पत्याला चौघांनी मारहाण करुन नेहा यांच्या अंगावरील दागिने लुटल्याची थरारक घटना गुरुवारी भरदिवसा दुपारी साडे तीन वाजता शिरसोली-रामदेववाडी रस्त्यावर टेकडीजवळ घडली. दरम्यान, या घटनेनंतर लगेच अर्ध्याच तासाच घटनास्थळापासून काही अंतरावर बळीराम आखाडू भील (१९, रा. शिरसोली) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे लुटमार व मृतदेह या दोन्ही घटनांचा एकमेकाशी संबंध आहे का?, असेल तर काय? याची चौकशी पोलीस करीत आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्राण येथील दिलीप पाटील हा तरुण पत्नी नेहा हिला जळगाव येथे घेण्यासाठी आला होता. दुपारी ते दोघं दुचाकीने घरी जात असताना रामदेववाडी शिवारात दिलीप लघुशंकेसाठी थांबला. त्याचवेळी जंगलातून आलेल्या दोघांनी पत्नी नेहा हिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढले आणि तिला मारहाण केली. हा प्रकार पाहून धावत आलेल्या दिलीप याला दोघांनी ओढून जंगलात नेले. तेथे आधीच दोन जण थांबलेले होते. तेथे दिलीप याला बेदम मारहाण झाली. डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाला.मृत पाळधीच्या ढाब्यावर कामालाया घटनेतील मृत बळीराम हा पाळधी येथील ढाब्यावर कामाला होता. वावडदा येथील डॉक्टर शेतातून येत असताना रस्त्यात अनोळखी तरुण मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृृष्ण पाटील यांना घटनेची माहिती दिली. पोलीस पाटलासोबत काही गावकरी आले असता त्यात बळीराम याचा चुलत भाऊ होता, त्यानेच त्याला ओळखले. नंतर पोलिसांना घटना कळविली.लुटीच्या घटनेनंतर अर्ध्या तासाने आढळला हाकेच्या अंतरावर मृतदेहज्या ठिकाणी लुटीची घटना घडली, त्यापासून हाकेच्या अंतरावर बळीराम आखाडू भील या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत. बळीराम हा पाळधी येथील ढाब्यावर कामाला आहे. रक्षाबंधनानिमित्त वरणगाव येथील बहीण सुशिला राहूल भील ही बुधवारी घरी आली होती. तिने रात्री बळीरामला राखी बांधली, नंतर सकाळी ती वरणगाव येथे रवाना झाली तर बळीराम देखील ११ वाजता कामावर जातो सांगून घराबाहेर पडला. रामदेववाडी शिवारात काहीही संबंध नसताना त्याचा मृतदेह या भागात कसा आला? असा प्रश्न निर्माण झाला. याची पोलीस चौकशी करीत आहेत.पत्नीची आरडाओरड अन् लुटारुंचे पलायनलुटमार व पती रक्ताच्या थारोळ्यात पाहून पत्नी नेहा रस्त्यावर आरडाओरड करायला लागली. तेव्हा दुचाकीने औरंगाबाद येथे जात असलेल्या जितेंद्र जायस्वाल या तरुणाने थांबून महिलेकडे धाव घेतली. तोपर्यंत संशयित लुटारु पसार झाले होते. नेहा यांच्याकडून लुटमारीची घटना ऐकून त्यांनी रस्त्यावरील लोकांना थांबविले. जखमी दाम्पत्याला तेथून म्हसावद येथे दवाखान्यात नेण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर लोकांनी लुटारुंचा शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही.दोघांची उशिरापर्यंत चौकशीघटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून दोन जणांना ताब्यात घेतले. त्यातील एक जण अल्पवयीन आहे. दरम्यान, जखमी दिलीप व त्याची पत्नी नेहा यांनी ताब्यात घेतलेल्याना ओळखले. रात्री उशिरापर्यंत दोघांची चौकशी सुरु होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सहायक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव