मुक्ताईनगर साखर कारखान्याजवळ कंटेनरने कामगाराला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:31 IST2018-02-26T15:31:37+5:302018-02-26T15:31:37+5:30

मुक्ताईनगर साखर कारखान्याजवळ सोमवारी सकाळी झाली घटना

Container crushed the worker to near the Muktainagar sugar factory | मुक्ताईनगर साखर कारखान्याजवळ कंटेनरने कामगाराला चिरडले

मुक्ताईनगर साखर कारखान्याजवळ कंटेनरने कामगाराला चिरडले

ठळक मुद्देमुक्ताईनगर साखर कारखान्याजवळ सोमवारी झाली घटनाकामगार बºहाणपूर चौफुल्लीकडे जात होते पायीअज्ञात ट्रकचालकाविरूद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा

आॅनलाईन लोकमत
मुक्ताईनगर, दि.२६ : महामार्गावरील मुक्ताई साखर कारखाना जवळ कंटेनर ने साखर कारखान्याच्या एक कामगाराला चिरडल्याने त्याचा जागीच ठार झाल्याची सोमवारी सकाळी साडेसात वाजता घडली
मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव शिवारातील संत मुक्ताई शुगर एनर्जी & प्रा.लि. या सहकारी कारखान्यात कर्मचारी असलेले अण्णा बाबूराव बेंद्रे (वय ६५ रा.मुळव्हा ता.उंबरखेड जि.यवतमाळ) हे सोमवारी सकाळी कारखान्यासमोर असलेल्या बºहाणपूर चौफुल्लीकडे पायी जात असतांना मलकापुर कडुन बºहाणपूर कडे भरधाव जाणाºया ट्रक कंटेनरच्या चालकाने बेंद्रे यांना जोरात धडक दिल्याने जागीच ठार झाले. याप्रकरणी भिकाजी कोल्हे (रा घोडसगाव) यांचे फियार्दीवरुन अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतले असुन घटनास्थळावरुन चालक फरार झालेला आहे . तपास सहाय्यक फौजदार माणिक निकम हे करीत आहे.

Web Title: Container crushed the worker to near the Muktainagar sugar factory