शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बालकांना बसावे लागते कुडाच्या छताखाली : चहार्डी येथील अंगणवाडीची दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 21:20 IST

भिंतीच नाहीत, चार्ट लावायचे कुठे ? येथील अंगणवाडीत ० ते ६ वर्षे वयोगटातील एकूण बालके (लाभार्थी) ८६ आहेत. येथे शासनाकडून मिळणारे शैक्षणिक साहित्य ठेवायला जागा नसते. भिंतीच नसल्याने बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी कार्यालयाकडून जे चार्ट, पोस्टर मिळतात ते लावता येत नाही.

चोपडा : चहार्डी येथील प्लॉट वस्तीज भागात गेल्या अनेक वर्षांपासून मिनी अंगणवाडी सुरू आहे. मात्र इमारत नसल्याने अंगणवाडी उघड्यावर भरत असते. गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस सुरू असल्याने शेळ्या आणि गुरे बांधले जाणाऱ्या कुडाच्या छताखाली भरते आहे.सविस्तर असे की, सध्या महाराष्ट्रभर अंगणवाडीमार्फत अनेक लाभाच्या योजना राबविल्या जातात. मात्र चहार्डी येथे वेले रस्त्याकडे असलेल्या प्लॉट वस्ती भागात मिनी अंगणवाडी भरते.या भागात सर्व आदिवासी समाजातील लोकांचे वास्तव्य आहे. म्हणून या मिनी अंगणवाडीत येणाºया लहान चिमुकल्यांना बसण्यासाठी स्वतंत्र इमारत अजूनही बांधलेली नाही. त्यामुळे या मिनी अंगणवाडीतील बालकांच्या नशिबी आतापासूनच दुर्दशा आणि संघर्षाला सामोरे जाण्याचे दिवस आले आहेत. कधी झाडाच्या सावलीत, कधी कुडाच्या झोपडीत तर कधी कुडाच्या छताखाली ही बालके बसवली जातात. तिथेच त्यांना आहार दिला जातो.या अंगणवाडीसाठी मनीषा ढोले (भोई) या सेविका म्हणून काम करतात. त्यांच्यासह या वस्ती भागातील आदिवासी ग्रामस्थांनी नवीन इमारत बांधून मिळण्याची मागणी केली आहे. वारंवार मागणी करूनही पंचायत समितीकडून दुर्लक्ष केले जात आहे. एकात्मिक प्रकल्प विभागाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

शासनाकडून मिनी अंगणवाडीसाठी इमारत बांधकाम करण्याची तरतूद नसते. परंतु अंगणवाडी कोणतीही असली तरी तिथे लाभार्थी असतातच. म्हणून मिनी अंगणवाडीसाठी नवीन इमारत व्हावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा भाडे तत्त्वावरही इमारत घेता येते. मी आजच प्रभार घेतला आहे. चहार्डी येथील इमारत बांधकामासाठी निश्चित प्रयत्न केले जातील.-संजय रतन धनगर, प्रभारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, चोपडा