शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरटय़ांचा शहरात उच्छाद

By admin | Updated: March 17, 2017 00:31 IST

जळगाव : शहरात दुचाकी चोरटय़ांनी उच्छाद मांडला असून दररोज दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत.

जळगाव : शहरात दुचाकी चोरटय़ांनी उच्छाद मांडला असून दररोज दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत.  गेल्या आठवडय़ात दोन पोलिसांच्या दुचाकी चोरीस गेल्या होत्या. अशा एकूण आठवडाभरात पाच दुचाकी चोरी गेल्या आहेत. गांधी मार्केट व भिलपुरा या दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरटय़ांनी दोन दुचाकी चोरुन नेल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली असून याबाबत शहर व शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकापाठोपाठ दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने वाहनधारकांमध्ये घबराट पसरली आहे.  धीरज यशवंत ठाकरे (वय 26 रा. वाल्मीक नगर) हा गांधी मार्केट परिसरातील विजय कलेक्शन येथे कामाला असून तो 30 जानेवारी रोजी नेहमी प्रमाणे सकाळी 10.30 वाजता दुचाकीने (क्र.एम.एच.19. बीएल. 8426) दुकानावर आला. सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास दुकानातील सुरक्षा रक्षकाने धीरजला दुचाकी चोरी झाल्याची माहिती दिली. त्याने गांधी मार्केट परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतु, मिळाली नाही. गुरुवारी धीरज ठाकरे याने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दुस:या घटनेत भिलपुरा परिसरात राहणारे गुलाम मोहम्मद रजवी (वय 40) यांची दुचाकी (क्र.एम.एच.19.सी.डी.9211) 14 मार्च रोजी सकाळी भिलपुरा परिसरातील मशिदीजवळून चोरी झाली आहे. त्यांनीही परिसरात दुचाकीचा शोध घेतला, मात्र आढळून आली नाही. अखेर गुरुवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उमाकांत चौधरी हे करीत आहेत.