शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल बँकेच्या मॅनेजरच्या बंदरावर चोरट्यांनी मारला सव्वा लाखाचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 22:58 IST

भुसावळ येथे चोरट्यांनी बंद घरातून १ लाख १० हजार लाख रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला.

ठळक मुद्देसलग तिसऱ्या दिवशी घरफोडी.भुसावळला घरफोडीचे सत्र सुरूच.

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ  : येथे  घरफोड्यांचे सत्र सुरुच असून सलग चौथ्या दिवशी चोरट्यांनी बंद घरातून १ लाख १० हजार लाख रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केल्याची घटना शहरातील प्रभात कॉलनी भागात ११ रोजी घडली. याबाबत शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की, प्रशांत भरतराव बेहेेरे हे शहरातील पवन नगर, प्रभात कॉलनी परीसरात कुटुंबासह राहतात.  सेंट्रल बँक भुसावळ शाखेत ते व्यवस्थापक आहेत.

दरम्यान,  बेहरे हे कामानिमित्त कुटुंबासह नाशिक येथे गेले असल्याची संधी  चोरट्यांनी साधली. घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून ५५ हजारांची रोकड, दोन तोळे वजनाचे  ५५ हजार रुपये किंमतीचे दागिने, ५ हजार रुपयांचे  सहा भार चांदीचे दागिने, लेडीज पर्स व फोर व्हिलरची चावी लांबवली. ९ ते १०  जानेवरी दरम्यान ही घरफोडी झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे पो.नि. निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी भेट देवून पाहणी केली. तपास सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.

दरम्यान विमल पाटील नगरात ही ९ रोजी शनिवारी रात्री चोरटे एका घरात प्रवेश करत असताना नागरिकांच्या लक्षात येताच चोरट्यांनी तिथून पळ काढला  होता अन्यथा याठिकाणी ही चोरीची घटना घडली असती. 

चोरीची पद्धत सारखीच

८ रोजी ॲड. योगेश बाविस्कर तसेच ९ रोजी शिवदत्त नगरातील रेल्वे कर्मचारीच्या घरी व बँक व्यवस्थापकाच्या घरी झालेल्या झालेल्या चोरीची पद्धत सारखीच असून चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त करून मिळेल ती रक्कम लांबवली.

 

टॅग्स :BhusawalभुसावळCrime Newsगुन्हेगारीThiefचोर