शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापिकेसमोर लघुशंका करणाऱ्या डॉक्टरला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

तर डॉ. राजेश पाटील यांच्या फिर्यादीवरून सतीश विश्वासराव मोरे, आनंदराव वाल्मीक मराठे व अनिल (पूर्ण नाव नाही) यांच्याविरुध्द दंगल ...

तर डॉ. राजेश पाटील यांच्या फिर्यादीवरून सतीश विश्वासराव मोरे, आनंदराव वाल्मीक मराठे व अनिल (पूर्ण नाव नाही) यांच्याविरुध्द दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

१) प्राध्यापिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार प्राध्यापिका, त्यांचे पती व इतर काहीजण १ फेब्रुवारी रोजी रात्री जेवण झाल्यानंतर ९.३० वाजता मेहरुण तलावाकाठी फिरायला गेले असता हायमास्ट लॅम्पच्या उजेडात त्यांच्यासमोर डॉ. राजेश पाटील लघुशंका करीत होते. त्याचा जाब विचारला असता, तुमच्या बापाची जागा आहे का, सगळ्यांसमोर मला खुल्या जागेत लघुशंका करायला आवडते, असे म्हणत आरडाओरड करायला सुरुवात केली. मोबाईलमध्ये फोटो घेतो आणि पोलिसांना पाठवितो असे म्हणताच डॉक्टरांनी सतीश मोरे यांना मारहाण करायला सुरुवात केली. प्राध्यापिकेने हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टरने त्यांचा हात पकडून दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पुढे गल्लीतील आनंदराव मराठे व इतरांनी त्यांना अडविले असता डॉक्टर व सोबतच्या दोघांनी त्यांनाही मारहाण केली, असे प्राध्यापिकेच्या फिर्यादीत म्हटले आहे.

२) डॉ. राजेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मेहरुण तलावाकाठी व्यायाम झाल्यानंतर रात्री ९.३० वाजता लघुशंका आल्याने सोबतचे अजय सोनवणे यांना थांबवून मोकळ्या जागेत कोणी येत नसल्याची ख‌ात्री करून लघुशंका केली. त्यानंतर मोकळ्या जागेत आल्यावर कोणीतरी माझा फोटो काढू लागला, त्यास जाब विचारला असता त्या व्यक्तीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायला लागल्यावर ही व्यक्ती पुन्हा समोर येऊन फोटो काढायला लागली. त्यास नम्रपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. १० ते १२ जणांना बोलावून त्यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली व त्यात एकाने लाथ मारल्याने कारवर जाऊन आदळलो. काही जणांनी धरून ठेवत मारहाण केली. मित्र अजय सोनवणे यांनी सोडविण्यासाठी विनवण्या केल्या. खुशाल जावळे व इतर मित्र तेथे आले व त्यांनी या लोकांच्या तावडीतून सोडविले. या घटनेत डोक्याला जबर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी फिर्यादीत म्हटले आहे.