खुनाचा प्रयत्न करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 20:51 IST2020-11-25T20:50:20+5:302020-11-25T20:51:36+5:30

पासून होता फरार : एलसीबीची कारवाई

The assassin smiled | खुनाचा प्रयत्न करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

खुनाचा प्रयत्न करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव : गरबा पाहण्यासाठी आलेल्या दोघांना लोखंडी रॉडने जीवंत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात महिनाभरापासून फरार असलेल्या हिरामण एकनाथ जोशी (३०, रा.नाथवाडा, सिंधी कॉलनी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. या पथकाने सलग दोन दिवस जोशी याच्यावर सापळा लावला होता. संशयिताला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गेल्या महिन्यात २५ रोजी रात्री ९ वाजता साहिल अकबर तडवी (१९,रा.नाथवाडा) व त्याचा मित्र जोगेश्वर मित्र मंडळ येथे गरबा पाहण्यासाठी गेले होते. तेथे हिरामण जोशी, गणेश सोनार व आणखी दोन अशा चार जणांनी किरकोळ कारणावरुन तडवी याला मारहाण करुन डोक्यात लोखंडी रॉड टाकून गंभीर जखमी केले होते. या घटनेचा थरार इतका होता की घटनास्थळावर पळापळ झाली होती. वेळीच उपचार मिळाल्याने तडवी याचे प्राण वाचले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. दरम्यान, जोशी हा नाथवाडा येथे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यांनी हवालदार शरद भालेराव, रामकृष्ण पाटील व कमलाकर बागुल यांच्यावर अटकेची जबाबदारी सोपविली होती. या तिघांनी सलग दोन दिवस सापळा लावला असता तो बुधवारी हाती लागला.

Web Title: The assassin smiled