शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावला भर रस्त्यावर १०८ अ‍ॅम्बुलन्सचे ब्रेक फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 21:17 IST

चार जण जखमी : चालकाच्या प्रंसगावधानामुळे अनर्थ टळला

धरणगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या १०८ अ‍ॅम्बुलन्सची दुरवस्था झाली असून त्याचा प्रत्यय १३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आला. या अ‍ॅम्बुलन्सचे अचानक ब्रेक फेल होऊन चार जण जखमी झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला.छत्रपती शिवाजी चौकासमोर असलेल्या गर्दीच्या रस्त्यावरुन जाताना अचानक अ‍ॅम्बुलन्सचे ब्रेक फेल झाल्याने मोटारसायकल स्वार व तीन पादचाऱ्यांना धक्का लागल्याने चार जण जखमी झाले. मात्र चालको गाडी वळवून रस्त्यावर असलेल्या दुभाजक व त्यास लागून असलेल्या टेलीफोन खांबास धडकल्याने मोठा अपघात टळला. जखमींपैकी दोघांना जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले तर दोघांना किरकोळ मार लागल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचार केले.येथील ग्रामीण रुग्णालयाची १०८ अ‍ॅम्बुलन्स (एमएच १४-०७९१) ही गाडी चालक प्रदीप बोदडे (रा.जळगाव) हे चालवित असताना हा अपघात घडला. तांत्रिक बिघाड त्याच्या लक्षात येताच त्यांनी अनेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यात रमेश नथ्थू चित्ते (वय ४९), प्रवीण राजेंद्र शिंदे (वय १८), छगन आनंदा बोरसे यांच्यासह आणखी एक असे एकूण चार जण जखमी झाले. रमेश चित्ते व प्रवीण शिंदे यांना स्थानिक रुग्णवाहिकेने अविनाश संजय चौधरी यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ.गिरीश चौधरी यांनी ग्रा.रुग्णालयात उपचार केले. घटनास्थळी सपोनि पवन देसले, होमगार्ड अशोक देशमुख आदींनी यांनी तातडीने धाव घेत पंचनामा करुन जेसीबीद्वारे अ‍ॅम्बुलन्स हटवली.