शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अष्टपैलू शलाका हिवाळेची राष्ट्रीय पातळीवर भरारी

By admin | Updated: January 12, 2015 13:33 IST

केवळ मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरातूनच नव्हे तर नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातूनही युवा क्रिकेट खेळाडू भरारी घेत आहे. याचा अनुभव शहरातील शलाका मधुकमल हिवाळे या युवतीच्या रूपातून आला आहे.

 नंदुरबार -  केवळ मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरातूनच नव्हे तर नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातूनही युवा क्रिकेट खेळाडू भरारी घेत आहे. याचा अनुभव शहरातील शलाका मधुकमल हिवाळे या युवतीच्या रूपातून आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात स्थान मिळविले. आता भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळविण्यासाठी तिची धडपड सुरू आहे.सोमवारी सार्ज‍या होणार्‍या युवक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. वयाच्या अकराव्या वर्षांपासून तिने लेदरबॉलने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. दोन वर्षे जिल्हा व विभाग स्तरावर सहभागी झाल्यानंतर तिची सन २0१0-११ मध्ये महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाच्या सराव शिबिरात निवड झाली. यानंतर त्यापुढील वर्षी २0११-१२ मध्ये नाशिक येथे राज्यस्तरावर अष्टपैलू खेळाचे दर्शन घडविले. याआधारे त्याच वर्षी १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघात तिची वर्णी लागली. यानंतर २0१२-१३, २0१३-१४ व २0१४-१५ अशी सतत तीन वर्षे तिने महाराष्ट्र संघात स्थान प्राप्त केले. यादरम्यान २0१३-१४ मध्ये महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय पातळीवर विजेतेपद मिळविले. त्यात तिने केलेल्या गोलंदाजीच्या आधारे सामन्याला कलाटणी देण्यात यश मिळविले होते. सध्या गेल्या दोन वर्षांपासून ती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात खेळत आहे. क्रिकेट खेळत असतानाच ती डॉजबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धेतही सहभागी झालेली होती. याशिवाय व्हॉलिबॉल, हॅण्डबॉल या खेळांमध्येही तिने राज्यस्तरावर सहभाग नोंदविला आहे.भविष्यात शलाकाला देशाकडून क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने तिची तयारी सुरू आहे. त्यासाठी ती दररोज सकाळी दोन ते तीन तास किक्रेटचा सराव करते. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शिबिरात ज्या पद्धतीने सराव करून घेतात त्याच पद्धतीचा सराव ती रोज मिशन हायस्कूलच्या मैदानावर करते. तसेच रोज दोन ते तीन किलोमीटर रनिंग करते. सरावापूर्वीचा व्यायाम झाल्यानंतर ती फिल्डिंगची तसेच कॅचची प्रॅक्टिस करते. नंतर ती सतत एक तास गोलंदाजीची प्रॅक्टिस करते व नंतर तेवढाच वेळ फलंदाजी करते. सरावादरम्यान अडचण आल्यास तिला तिचे वडील तथा कोच डॉ.मधुकमल हिवाळे व औरंगाबादमधील कोच लव्हेरा तिला मार्गदर्शन करतात. 

उत्कृष्ट मध्यम गती गोलंदाज, सहाव्या क्रमांकावर फलंदाजी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणारी शलाका हिवाळे हिची अष्टपैलू खेळाडू कामगिरी झालेली आहे. अष्टपैलू खेळाडू शलाकाला चांगला खेळाडू बनण्यासाठी लहानपणापासूनच खेळात आवड निर्माण केली व रोज सराव केल्यानंतरच यश मिळेल, याची वेळोवेळी जाणीव करून देतो. सतत पाच वर्षे रोज सकाळी दोन ते तीन तास सराव करून घेत आहे. या दरम्यान राज्य व राष्ट्रीय पातळीवर टिकून राहण्यासाठी जे कौशल्य लागते याकडे आपण लक्ष देतो. तिच्या होणार्‍या चुका निदर्शनास आणून देतो.-डॉ. मधुकमल हिवाळे, शलाकाचे वडील तथा कोच रवींद्र मोराणकर