जळगाव : राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे़ दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बांधितांची संख्या ही वाढत आहे़ शनिवारी एका दिवसात तब्बल १६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर ५७, जळगाव ग्रामीण १२, भुसावळ ०९, अमळनेर १८, चोपडा ०४, पाचोरा ०१, भडगाव ०३, धरणगाव ०३, यावल ०८, एरंडोल १४, जामनेर १४, रावेर ०५, पारोळा ०२, चाळीसगाव ०२, मुक्ताईनगर ०१, बोदवड १६ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 हजार 176 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}