शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरातील १५ हजार विमाधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST

कापूस उत्पादकता घटल्याने भरपाईचे विमा कंपनीला आदेश लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : पावसाने सुरुवातीचे दोन महिने ...

कापूस उत्पादकता घटल्याने भरपाईचे विमा कंपनीला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : पावसाने सुरुवातीचे दोन महिने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पन्न हातचे गेल्याने नजरअंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादन क्षमता ही ५० टक्क्यांपेक्षा खूपच कमी दिसून आल्याने तालुक्यातील आठही मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के रक्कम आगाऊ म्हणून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विमा कंपनीला दिले आहेत.

संपूर्ण अमळनेर तालुक्यात सुरुवातीचे दोन महिने पाऊस न पडल्याने पिके वाढली नाहीत. कालमर्यादा संपली होती. हातचे उत्पन्न गेले होते. त्यामुळे पीक विमा मिळावा म्हणून तालुक्यातील विविध शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा स्वतंत्र पथके पाठवून पीक पाहणी केली होती. त्यात गेल्या सात वर्षातील कापसाची सरासरी कापूस उत्पादकता किलोमध्ये प्रति हेक्टरी ग्राह्य धरून नजर अंदाजानुसार यावर्षी पावसाअभावी अथवा खंड पडल्याने किती येऊ शकतो याची पाहणी करण्यात आली. त्यात आठही मंडळात अपेक्षित उत्पन्न हे ५० टक्केपेक्षा खूप कमी येत असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शासन नियमानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जोखीम ही बाधित अधिसूचित क्षेत्रातील कापूस पीकविमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केल्यानंतर पीक हंगामाच्या अखेरीस उत्पन्नाच्या आधारे निश्चित करण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहील व आगाऊ रक्कम नुकसान भरपाईत समायोजित करण्यात येईल.

कोट

तालुक्यात ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली असून त्यातील ५०% म्हणजे १५ हजार २६ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. हेक्टरी ४० हजार पीक विमा संरक्षित रक्कम असल्याने त्यांच्या २५% म्हणजे शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये मिळतील

.- भारत वारे, तालुका कृषी अधिकारी, अमळनेर

जिल्हाधिकाऱ्यांनी पथकांमार्फत केलेल्या सर्वेक्षणात पुढीलप्रमाणे सात वर्षातील सरासरीच्या ५०टक्के उत्पादकता किलोमध्ये प्रतिहेक्टर व अपेक्षित उत्पादकता किलोमध्ये प्रति हेक्टरी पुढीलप्रमाणे

मंडळ ५०टक्के अपेक्षित

उत्पादकता उत्पादकता

अमळगाव ३८३.४ ११५.०

अमळनेर ४०९.२ ९८.२

भरवस ३७२.० ७४.४

मारवड ४२२.७ १०९.९

नगाव ३६९.६ ९६.१

पातोंडा ३९१.८ ११७.५

शिरूड ३२५.६ १३६.७

वावडे ३७०.५ १४०.८