शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी महिलेच्या बॅगेतून लांबविली १० हजारांची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अमळनेर-जळगाव बसमधून प्रवास करत असताना पल्लवी सुनील चौधरी (रा. महाबळ) यांच्या बॅगेतून १० हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अमळनेर-जळगाव बसमधून प्रवास करत असताना पल्लवी सुनील चौधरी (रा. महाबळ) यांच्या बॅगेतून १० हजार रुपयांची रोकड चोरल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

महाबळ येथील पल्लवी चौधरी या अमळनेर येथे गेल्या होत्या. जळगावात परतण्यासाठी शनिवारी दुपारी १२.३० वाजता त्या अमळनेर-जळगाव एसटी बसमध्‍ये बसल्या. दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगावातील आकाशवाणी चौकात उतरल्या. त्यांनी त्यांची बॅग तपासली असता, त्यात ठेवलेले १० हजार रुपये चोरीला गेल्याचे दिसून आले.

बसमधील महिलेवर संशय

अमळनेर-जळगाव बसमधून खाली उतरत असताना चौधरी यांना मागे उभ्या असलेल्या महिलेने धक्का दिला होता. त्यावेळी त्या महिलेने बॅगेची चेन उघडून रोकड लांबविली, असा संशय चौधरी यांना आहे. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली. पाठीमागे उभ्‍या असलेल्या महिलेचे वर्णनसुद्धा पोलिसांना सांगितले. दरम्यान, शनिवारी सायंकाळी या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास चंद्रकांत पाटील करीत आहेत.