शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

संशयाने संपवला संसार ! कुऱ्हाडीने वार करून आधी पत्नीस केले ठार नंतर घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 18:00 IST

बाजीराव लहाने यांनी अनेकवेळा मैनाबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेवून त्यांना मारहाण केली होती.

ठळक मुद्देजालना तालुक्यातील वंजार उमरद येथील घटना

मानदेऊळगाव - चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस ठार केले, त्यानंतर विष प्राशन करून पतीने आत्महत्या केल्याची घटना जालना तालुक्यातील वंजार उमरद येथे सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मैनाबाई बाजीराव लहाने (४८) व बाजीराव दामाजी लहाने (५२) अशी मयतांची नावे आहेत.

मैनाबाई लहाने व बाजीराव लहाने हे दोघे मुलगा व सुने सोबत वंजार उमरद येथील शेतात राहतात. बाजीराव लहाने यांनी अनेकवेळा मैनाबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेवून त्यांना मारहाण केली होती. सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मुलगा किराणा सामान आणण्यासाठी गावात गेला होता. हीच संधी साधत बाजीराव लहाने यांनी मैनाबाई यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून ठार केले. हे विदारक चित्र पाहताच सून बेशुध्द झाली. त्यानंतर विष प्राशन करून बाजीराव लहाने यांनी आत्महत्या केली.

मुलगा परत आल्यावर त्याला रक्तबंबाळ अवस्थेत आई दिसली. तर वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोनि. देविदास शेळके, सपोनि. संभाजी वडते यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यापुढील तपास सपोनि. संभाजी वडते हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा सैनिक आहे तर एक मुलगी ग्रामविकास अधिकारी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना