शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू’; अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून जरांगेंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:25 IST

सरकारसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे मांडणार; शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे

वडीगोद्री (जालना): मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारला थेट इशारा दिला आहे. "शेतकऱ्यांना तात्काळ मदत आणि आधार द्या, अन्यथा त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष करू," असे जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले. अंबड तालुक्यातील महाकाळा शिवारात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

९ एकर तूर पाण्याखाली
सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे महाकाळा शिवारातील शेतकरी सोमनाथ लहाने यांच्या गट नंबर २२ मधील शेतात मोठे नुकसान झाले आहे. जरांगे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्याने लावलेली तब्बल ९ एकर तूर पाण्यात पूर्णपणे बुडाली असून, शेतातून खाली उतरणेही शक्य होत नाही, असे भयानक चित्र त्यांनी पाहिले. "शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे," असे सांगत जरांगे पाटील यांनी सरकारला जागे केले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना माहिती देणार
या नुकसानीबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्र्यांना माहिती देणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. "मी सरकारसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे मांडणार आहे. सरकार जर याकडे दुर्लक्ष करेल तर त्यांच्यासाठी आपण शांत बसणार नाही, रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभारू," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी