शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 20:03 IST

या दोन्ही घटनेत एकूण आठजण गंभीर जखमी झाले आहेत.

भोकरदन/फकिरा देशमुख- तालुक्यात आज (18 मे) दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहिली घटना केदारखेडा येथे घडली. दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका झोपडीजवळ वीज  कोसळली, यात झोपडीत बसलेल्या राहुल विठ्ठल जाधव(वय 18) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचे आई-वडील आणि काका गंभीर जखमी झाले आहेत. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, 18 मे रोजी राहुल विठ्ठल जाधव, त्याचे वडील विठ्ठल मुरलीधर जाधव(वय 45) आई दुर्गाबाई विठ्ठल जाधव(वय 42) व काका काकासाहेब कैतिकराव जाधव (वय 40) हे केशव सुपडा जाधव यांच्या केदारखेडा शिवारातील गट क्रमांक 207 मध्ये काम करत होते. दुपारी 3 वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी हे चोघेजण शेतातील झोपडीत बसले. 

यावेळी 3.30 वाजेच्या सुमारास झोपडीवर वीज कोसळली, यात राहुल विठ्ठल जाधव जागीच ठार झाला, तर त्याचे वडील, आई आणि काका गंभीर जखमी झाले. वीज कोसळण्याच्या आवाजामुळे शेजारील शेतकऱ्यांनी धाव घेतली व जखमींना केदारखेडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरने  राहुल यास मृत घोषित केले. इतर जखमींवर प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविले आहे. 

दुसरी घटनातालुक्यातील भायडी शिवारात सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान लिंबाच्या झाडावर वीज कोसळून, झाडाखाली आडोशाला उभे असलेले रामदास आनंदा कड (वय 38,रा सिपोरा बाजार) जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींमध्ये समाधान रामराव पिसे, रामेश्वर भागाजी बर्डे, संतोष अर्जुन दळवी, गणपत नामदेव दळवी आणि दत्तू संतुकराव दळवी यांचा समावेश आहे. जखमींवर भोकरदन येथील दशरथ बाबा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

टॅग्स :thunderstormवादळJalanaजालना