शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

जालना आगाराच्या ताफ्यात दाखल होणार तीन नवीन वातानुकूलित बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:59 IST

प्रवाशांचा दूरचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी जालना आगारात विना- वातानुकूलित आसनी व शयनयान अशी एकत्रित सेवा असलेल्या तीन बसेस दाखल होणार असल्याची माहिती आगारप्रमुख पंडित चव्हाण यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रवाशांचा दूरचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी जालना आगारात विना- वातानुकूलित आसनी व शयनयान अशी एकत्रित सेवा असलेल्या तीन बसेस दाखल होणार असल्याची माहिती आगारप्रमुख पंडित चव्हाण यांनी दिली.एम. जी. आॅटोमोटिव्ह ह्या बस कंपनीने या बसेची बांधणी केली आहे. जालना आगारातून काही बस सुरत व इंदौर येथे जातात. इंदौरसाठी ५७० रूपये व सुरतसाठी ६१५ रूपये दर एसटी. महामंडळाकडून प्रवाशांना आकारला जात आहे. दूरच्या प्रवासाला अनेकदा प्रवाशी खासगी बसला प्राधान्य देतात. यात महामंडाळाचे नुकसान होत आहे. हीच बाब हेरून एस.टी. महामंडाळातर्फे एस.टी.च्या बांधणीत बदल करण्यात आला आहे. प्रवाशांची आवड लक्षात घेवून विना- वातानुकूलित आसनी व शयनयान अशी एकत्रित सेवा प्रवाशांना देणाऱ्या बसची बांधणी करण्यात येत आहे. या तीन बसची जालना विभागीय कार्यालयातर्फे वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली आहे. याला वरिष्ठांनी होकार दिला आहे. येत्या आठवड्याभरात या बस जालना आगारात दाखल होणार आहेत. या बसचे सीट आणि बर्थ यासाठी वेगवेगळे भाडे आकारणी केली जाणार आहे. या बसवरील चालकांना काही दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या बसमुळे बस आगाराच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा विश्वास महामंडाळाच्या अधिकाऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. या एका बसमध्ये ३० सीटर आणि स्लीपर १५ असे एकूण ४५ आसणे आहेत.

टॅग्स :state transportएसटीroad transportरस्ते वाहतूक