मराठा आरक्षणासाठी जिल्हाभरात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST2021-02-15T04:27:17+5:302021-02-15T04:27:17+5:30

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साष्टपिंपळगाव (ता.अंबड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ...

Sit in the district for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी जिल्हाभरात ठिय्या

मराठा आरक्षणासाठी जिल्हाभरात ठिय्या

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साष्टपिंपळगाव (ता.अंबड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींसमोर रविवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

जालना तालुक्यातील माळशेंद्रा ग्रामपंचायतीसमोर रविवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी गावातील मराठा समाजातील पुरुष, महिला, तरुण ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र जमले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी शिवाजी जाधव, सुरेश जाधव, संजय म्हस्के, संतोष जाधव, बाबासाहेब म्हस्के यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत माहिती दिली. यावेळी आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच आनंद म्हस्के यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. या आंदोलनात उपसरपंच बाळू जाधव, रामेश्वर जाधव, गंगाधर जाधव, शेषराव म्हस्के, अंबादास जाधव, शिवाजी जाधव, देवीदास वराडे, बाबासाहेब म्हस्के, विठ्ठल म्हस्के, राजू म्हस्के, ग्रामपंचायत सदस्या भागूबाई जाधव, यमुना जाधव, आयोध्या जाधव, कंचनाबाई जाधव, सरस्वतीबाई म्हस्के यांच्यासह तरुणांनी सहभाग घेतला.

वडीगोद्री ग्रामपंचायतीसमोर आंदोलन

वडीगोद्री : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी रविवारी येथील ग्रामपंचायतीसमोर मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

आंदोलनात गावातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व जातीधर्माच्या समाजबांधवांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भावना व्यक्त केली. वडीगोद्री येथे सुरू असलेल्या या आंदोलनात परिसरातील अंतरवाली सराटी, नालेवाडी, पाथरवाला खुर्द, धाकलगाव, शहापूर येथील ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच पंढरीनाथ खटके, शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब गावडे, तर ओबीसी समाजाच्या वतीने बाबासाहेब बोंबले, मुस्लीम समाजाच्या वतीने फारुख शेख, धनगर समाजाच्या वतीने नारायण वायाळ, वंचित आघाडीच्या वतीने दादासाहेब गांगुर्डे, बंजारा समाजाच्या वतीने रोहिदास पवार यांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी शिवाजी काळे, सुरेश काळे, दिलीप दखणे, सोमनाथ काळे, प्रसाद पिंगळे, नितीन काळे, अण्णासाहेब काळे, अशोक मांगदारे, संजय काळे, रवींद्र घाडगे, सूरज काळे, रवींद्र खोमणे, प्रवीण काळे, प्रभाकर काळे, मुकुंदा काळे, संभाजी काळे, अ‍ॅड. ज्ञानेश्वर गावडे, पांडुरंग काळे, अंगद काळे, अजय काळे, रामप्रकाश तारख, अ‍ॅड. विजय खटके, अभिजित काळे, कार्तिक काळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

फोटो

Web Title: Sit in the district for Maratha reservation