जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार; ६० विद्यार्थ्यांची सिनिअरविरुद्ध तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:27 IST2026-04-29T14:24:31+5:302026-04-29T14:27:37+5:30

ज्युनिअर्सचा छळ करणाऱ्या वरिष्ठांची खैर नाही! जालन्यात १३ जणांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन

Ragging Incident at Jalna Government Medical College; 13-Member Committee to Probe Senior Students | जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार; ६० विद्यार्थ्यांची सिनिअरविरुद्ध तक्रार

जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार; ६० विद्यार्थ्यांची सिनिअरविरुद्ध तक्रार

जालना : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा छळ केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाविद्यालय प्रशासनाने १३ सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असून, चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या ६० विद्यार्थ्यांनी ‘अँटी रॅगिंग सेल’ कडे तक्रार केली होती. दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनी नियमांचे उल्लंघन करून आपल्याला त्रास दिला, असे पीडित विद्यार्थ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीमुळे वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रॅगिंगची तक्रार प्राप्त होताच अधिष्ठाता डॉ. सईदा अफरोज यांनी तातडीने बैठक बोलावली. घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी १३ जणांची एक समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती सध्या संबंधित विद्यार्थी, प्रत्यक्षदर्शी आणि अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवत आहे.

लवकरच अहवाल येईल
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांविरुद्ध रॅगिंगची तक्रार केली आहे. त्यानुसार आम्ही तातडीने १३ जणांची चौकशी समिती स्थापन केली असून, विद्यार्थ्यांची सखोल चौकशी केली जात आहे. चौकशीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल आणि त्यानुसार पुढील पावले उचलली जातील.
-डॉ. सईदा अफरोज, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना.

दोषींवर होणार कारवाई
रॅगिंग प्रतिबंधक कायद्यानुसार जर तक्रारीत तथ्य आढळले तर संबंधित दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो. आता चौकशी समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : जालना मेडिकल कॉलेज में रैगिंग का आरोप; छात्रों ने सीनियर्स पर लगाया आरोप

Web Summary : जालना मेडिकल कॉलेज में रैगिंग का मामला सामने आया। साठ छात्रों ने सीनियर्स के खिलाफ शिकायत की। उच्च स्तरीय जांच जारी है। आरोप सही पाए जाने पर कार्रवाई होगी।

Web Title : Ragging Allegations at Jalna Medical College; Seniors Accused by Students

Web Summary : Jalna Medical College faces ragging allegations. Sixty students complained against seniors. A high-level inquiry is underway. Action will be taken if allegations are proven true.