वाकुळणी ग्रामपंचायतमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:31 IST2021-01-20T04:31:28+5:302021-01-20T04:31:28+5:30

वाकुळणी येथील ग्रामपंचायत ९ सदस्यांची असून, यावेळी या ग्रामपंचायतच्या निवडणुकीकरता दोन वेगवेगळ्या पॅनलची समोरासमोर लढत झाली. यामध्ये बाळासाहेब वैद्य, ...

Opportunity for new faces in Wakulani Gram Panchayat | वाकुळणी ग्रामपंचायतमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी

वाकुळणी ग्रामपंचायतमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी

वाकुळणी येथील ग्रामपंचायत ९ सदस्यांची असून, यावेळी या ग्रामपंचायतच्या निवडणुकीकरता दोन वेगवेगळ्या पॅनलची समोरासमोर लढत झाली. यामध्ये बाळासाहेब वैद्य, गौतम खिल्लारे, जनार्दन अवघड, रुपाबाई जाधव, गणेश कोळकर, रविला कोळकर, दुर्गा कोळकर, वत्सला जाधव, सुमन काळवणे आदी उमेदवार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार नवीन असून, त्यांची ही पहिलीच टर्म आहे. या ग्रामपंचायतमध्ये एकूण ९ ग्रा. पं. सदस्यांपैकी पाच महिला सदस्य निवडून आल्या आहेत. त्यामुळे या ग्रा.पं. मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला निवडून आल्या आहेत. या ग्रामपंचायतमध्ये सर्वच सदस्य नवखे असले तरी आम्ही सर्वजण गावातील अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घेऊन गावचा कारभार चालवून ग्रामस्थांना अधिकच्या सुविधा देऊ, शिवाय गावात- जास्तीत जास्त विकास कामे करण्यावर भर दिला जाईल, असा विश्वास नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनी व्यक्त केला.

Web Title: Opportunity for new faces in Wakulani Gram Panchayat